शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

धडधडत स्वप्नपूर्तीकडे नेणारी जीवनवाहिनी

By admin | Published: October 21, 2015 11:35 PM

कोकण रेल्वे : सुखकारक प्रवासाचे स्वप्न साकार

रत्नागिरी : कोकण रेल्वे हे कोकणी माणसाचे स्वप्न होते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत १९९० साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेला १५ आॅक्टोबर २०१५ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. या काळात कोकणी माणसाचा प्रवास सुखकारक झालाच, पण कोकण रेल्वेमुळे कोकणाचे नाव जगभरात पोहोचले आहे.कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री मधु दंडवते व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. नवी मुंबईमधील सीबीडी - बेलापूर येथे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली. ई. श्रीधरन हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते. १५ आॅक्टोबर १९९०ला या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले. १९६०पासून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली.हा प्रकल्प विकासात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. १९७०च्या आसपास पहिला प्रवास करण्यात आला. १९७१ ते १९७३ मध्ये मंगळूरपर्यंतचे सर्वेक्षण केले गेले. १९७५मध्ये दासगाव ते रत्नागिरीपर्यंत सर्वेक्षण केले गेले. १९८४मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून रोहा आणि मंगळूरला दक्षिण रेल्वे सोबत जोडण्यासाठीचे काम सुरू करण्याबाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. सुरुवातीला मडगाव ते मंगळूरपर्यंत ३२५ किलोमीटर लांबीच्या भागाचे सर्वेक्षण केले गेले, तर मार्च १९८५मध्ये या रेल्वे मार्गाचे विस्तृतीकरण केले गेले.१९६०मध्ये पनवेलला दिवा आणि १९६६मध्ये पनवेलला आपटा जोडून कोकण रेल्वेचा विस्तार केला गेला. १९८६ मध्ये रोह्यापासून आपटापर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रथमच शासनाने मोठ्या योजनेला मंजुरी दिली. या योजनेचा फायदा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांना झाला. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या सोयी - सुविधा वाढवण्याची गरज आहे. कोकण रेल्वेमध्ये अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये सरकते जिने, स्थानकांवर वायफायची सुविधा सी. सी. टी. व्ही., कॅमेरा, एल. ई. डी. लाईटची सुविधा, लाँड्रीची सुविधा, बॉयोटॉयलेट, वॉटर कुलरची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे. नागरिकांच्या मागणीनुसार राजापूर तालुक्यातील सौंदळ व लांजा तालुक्यातील वेरवली येथे नवीन रेल्वे स्थानके उभारण्यात येणार आहेत. कोकणातील बचत गटांनी तयार केलेला कोकणी स्वाद नावाचा कोकणी मेवा कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर आता मिळू लागला आहे. स्थानिक महिलांना यातून रोजगार मिळत आहे. कोकण रेल्वेचे कोकणच्या विकासात योगदान निश्चितपणे आहे. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण व दुपदरीकरणामुळे त्यात आणखी वाढ होणार आहे. कोकण रेल्वेमुळे कोकणचे नाव जगभरात पोहोचले आहे. (प्रतिनिधी)कोकण रेल्वे हा मुंंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. कोकण रेल्वेची लांबी ७४१ किलोमीटर आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कोकण ह्या भौगोलिक प्रदेशामधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सुरु होतो व कर्नाटकातील ठोकुर येथे संपतो. कोकण रेल्वेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम नुकताच सिडको प्रदर्शन सेंटर वाशी, नवी मुंबई येथे झाला. या कार्यक्रमात कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण लवकरच होणार अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलीकोकणातील रिक्षा-टॅक्सीचालकांना पर्यटन मार्गदर्शकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सावंतवाडी टर्मिनसचे कामही येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार असून, चिपळूण ते कराड व वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग आगामी काळात सुरु होणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या डिझेलवर चालतात त्यामुळे आणि एकेरी मार्गामुळे गाड्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येत आहेत. विद्युतीकरण आणि लोहमार्ग दुपदरीकरणामुळे इंधनाची बचत होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे..