शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
3
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
4
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
5
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
6
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
7
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
8
AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'
9
“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे
10
"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?
11
"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी
12
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
13
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
14
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल
15
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
16
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
17
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
18
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
19
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
20
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!

कोकण रेल्वेच्या वेगावर मर्यादा!

By admin | Published: June 06, 2017 9:23 PM

गणेशोत्सवासाठी जादा गाड्या : वेळापत्रक ठरले; मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळ बदलल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी पावसाळी हंगामातील नवे वेळापत्रक येत्या १० जूनपासून लागू होत असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून रेल्वेच्या वेगावरही आता मर्याद येणार आहे. पावसाळ््यातील सुरक्षितेसाठी ही उपाययोजना व वेळापत्रक असेल.पावसाळी वेळापत्रकात मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळी हंगामात रेल्वे मार्गावर दरडी कोसळून अपघात होऊ नये म्हणून खबरदारी चा उपय म्हणून गाड्यांचा वेग मंदावणार असून, सर्व ठिकाणी दक्षता घेण्यात येणार आहे.कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत लागू राहणार आहे, तर मुंबईतून गोव्याच्या दिशेने सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. मात्र, मुंबईहून येणाऱ्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर आल्यानंतर वेग मंदावल्याने पोहोचण्याच्या वेळा बदलणार आहेत. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. काही स्थानकांचे सुशोभीकरण, आधुनिक सुविधा करण्यात आल्या असून, काही रेल्वे स्थानकांवर बायोटॉयलेटची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘तेजस’ ही अत्याधुनिक रेल्वेगाडी प्रथमच कोकण रेल्वेमार्गावर सोडण्यात आली. या गाडीलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाबाबतही प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, खबरदारीचा इशारा म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी हंगामात दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही दक्षता घेण्यात आली आहे.१० जूनपासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा ठरल्या असून, यामध्ये एर्नाकुलम ते निजामुद्दीन १२६१७ - मंगला एक्स्प्रेस ही गाडी मडगाव येथून मध्यरात्री १.४७ वाजता सुटून पहाटे ३.३२ वाजता कणकवलीत पोहोचणार आहे. डबलडेकर ११०८६ ही गाडी मडगाव येथून पहाटे ५.३० ला सुटून सकाळी ८ वाजता कणकवलीत पोहोचेल. मांडवी एक्स्प्रेस १०१०४ ही गाडी मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटून कणकवलीत सकाळी ११.०१ वाजता पोहोचेल. जनशताब्दी १२०५२ ही गाडी मडगाव येथून दुपारी १२ वाजता सुटून कणकवलीला दुपारी २.२० वाजता पोहोचेल. एर्नाकुलम-पुणे ०१२३४ ही गाडी मडगाव येथून दुपारी १.४० वाजता सुटून कणकवलीत दुपारी ३.१६ वाजता पोहोचेल. कोकणकन्या एक्स्प्रेस १०११२ ही गाडी मडगाव येथून सायंकाळी ४.४५ वाजता सुटून कणकवलीत सायंकाळी ७.१३ वाजता पोहोचेल.मेंगलोर-मुंबई एक्स्प्रेस १२१३४ ही गाडी मडगाव येथून रात्री ९.५० वाजता सुटून रात्री ११.५६ वाजता कणकवलीत पोहोचेल. तसेच सावंतवाडी-दिवा ५०१०६ ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी ८.३० वा. सुटून कणकवलीतून सकाळी ९.२४ वाजता मुंबईकडे रवाना होईल. एर्नाकुलम ते ओखा १६३३८ ही गाडी मडगाव येथुन सकाळी ११.४० वाजता सुटून कणकवलीत दुपारी २ वाजता पोहोचेल. राज्यराणी १०१०४ -तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून रोज सायंकाळी ५.३० वाजता सुटून सायंकाळी ६.२६ वाजता कणकवलीत पोहोचेल. त्यानंतर मुंबईकडे रवाना होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच हे पाऊल उचलल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.गणेशोत्सवासाठी जादा गाड्यागणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०११४४५ सीएसटी-करमळी ही गाडी १८ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून सीएसटी येथून मध्यरात्री १२.३० वाजता सुटून करमळीला दुपारी २.३० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा आणि थिवीम येथे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी १७ डब्यांची असून, वातानुकूलित चार, स्लीपर पाच, जनरल सहा आणि दोन एसएलआर कोच असणार आहेत.दादर-सावंतवाडी ०१११३ आणि सावंतवाडी-दादर ०१११४ ही गाडी आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. दादर येथून १८ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी ७.५० वाजता सुटून सावंतवाडीला सायंकाळी ६.५० वाजता पोचणार आहे. परतीसाठी सावंतवाडी येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी पहाटे ४.५० ला सुटून दादरला सायंकाळी ४ वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. एलटीटी ते सावंतवाडी या मार्गावर ०१०३७ ही गाडी २४ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी रात्री ९.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सकाळी ९ वाजता पोहोचणार आहे. परतीसाठी ०१०३८ ही गाडी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी दुपारी २.५ वाजता सूटून एलटीटीला रात्री १२.२० वाजता पोचणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत. तसेच पुणे-सावंतवाडी-पुणे या मार्गावर ०१४२३ ही गाडी पुणे येथून २४ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत दर गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटून सावंतवाडीला सायं. ७ वाजता पोचणार आहे.करमळी ते पुणे या मार्गावर ०१४४६ ही गाडी १८ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार असून, करमळी येथून दुपारी ३.२५ वाजता सुटून पुणे येथे पहाटे ५.५० ला पोहोचेल. या गाडीला थिवीम, मडुरा, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि लोणावळा येथे थांबे देण्यात आले आहेत.