शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान

By admin | Published: October 16, 2015 9:58 PM

तळकट-देऊळवाडीतील थरार : वनविभागाच्या निष्क्रियपणाचा पुनश्च अनुभव

कसई दोडामार्ग : भक्ष्याच्या शोधात असणारा बिबट्या तळकट-देऊळवाडी येथील बांबूच्या बेटात लावण्यात आलेल्या फासकीत गुरूवारी रात्री अडकला. फासकीतून सुटण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने बिबट्या जखमी झाला. रात्रभराच्या प्रयत्नानंतर अयशस्वी ठरलेल्या बिबट्याला शुक्रवारी वनविभागाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर जेरबंद केले. त्याला झालेल्या जखमेवर सावंतवाडीत उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पण याहीवेळी वनविभागाच्या निष्क्रियतेचा पुनश्च अनुभव ग्रामस्थांना घटनास्थळी आला आहे. तळकट परिसरात गेले कित्येक दिवस बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांतून येत होत्या. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विविध ठिकाणी फासक्या लावल्या होत्या. पण बिबट्या या फासक्यांना बगल देत परिसरातील शेतवाडीत वावरत होता. यामुळे शेतकऱ्यांच्यात नि:संदिग्ध भितीचे वातावरण होते. वनविभागामार्फत लावण्यात आलेल्या तळकट-देऊळवाडी परिसरातील एका बांबूच्या बेटातील फासकीत गुरूवारी रात्री बिबट्या अडकला. भक्ष्याच्या शोधात फिरणारा हा बिबट्या उपाशीपोटीच फासकीत अडकल्याने जीवाच्या आकांताने त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करत होता. फासकीच्या आवळलेल्या तारेमुळे त्याच्या शरीराला जखमा झाल्या पण त्याची सुटका झाली नाही. रात्रभराच्या प्रयत्नानंतर तो अपयशी ठरला. अखेर शुक्रवारची सकाळ उजाडली आणि बिबट्याच्या आवाजाने देऊळवाडी परिसरात ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली. सकाळी सहाच्या सुमारासच घटनास्थळी शेकडो ग्रामस्थ फासकीत अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी, त्याचा फोटो काढण्यासाठी जमले होते. ग्रामस्थांच्या जमावाने भेदरलेला बिबट्या सुटकेसाठी त्वेषाने अयशस्वी प्रयत्न करत होता. पण वारंवार निष्फळ ठरणाऱ्या प्रयत्नांनी तो कासावीस झाला होता. काही सुजाण नागरिकांनी वेळेचे भान राखत वनविभागाला याची माहिती दिली. दरम्यान, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे पथक दाखल झाले. वनक्षेत्रपाल संजय पाटील, वनपाल दत्ताराम देसाई, अमित कटगे, महादेव नाईक, संजय मिरकर, गिरीष पंजाबी आदींच्या पथकाने पिंजरा, जाळी व आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी आपली हजेरी लावली. पण बिबट्याला बेशुद्ध करणारी गन अनेक प्रयत्नानंतरही निष्फळ ठरत होती. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शेवटी बिबट्याच्या अंगावर जाळी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जाळी टाकण्यात आली. जाळीत टाकलेल्या बिबट्याला इंजेक्शनच्या सहाय्याने बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर उपस्थित पशुवैद्यकीय डॉ. प्रसाद ठाकूर यांनी बिबट्याची तपासणी करत त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांच्या गोंधळामुळे उपचारात अडथळा येत होता. त्यामुळे बिबट्यावर सावंतवाडीत उपचार करण्यात आले. त्यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. (वार्ताहर)वनविभागाची निष्क्रियता : तर परिस्थिती हाताबाहेरवनविभागाच्या हलगर्जीपणाची व त्यांच्याकडील उपलब्ध साधन सामुग्रीच्या वापराचा कित्येकवेळा वाईट अनुभव आलेला आहे. ााहीवेळी तसाच अनुभव ग्रामस्थांना पहावयास मिळाला. फासकीत अडक लेल्या बिबट्याला बेशुद्ध करणारी गनच वारंवारच्या प्रयत्नानंतरही निष्फळ ठरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. जर का बिबट्या फासकीतून निसटला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. तर वनविभागाला सकाळी सहा वाजता माहिती देऊनही ते नऊच्या सुमारास आले. यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाच्या पथकावर प्रश्नांचा भडीमार केला.वनविभागामार्फत लावण्यात आलेल्या फासकीत बिबट्या अडकला. रात्रभर जिवाच्या आकांताने त्याने सुटके साठी प्रयत्न केले. पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. पण जर शुक्रवारी सकाळी त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या गर्दीने तो अधिक आक्रमक झाला होता. या त्याच्या आक्रमतेतून तो जर सुटला असता तर परिस्थिती नक्कीच हाताबाहेर गेल्याशिवाय राहिली नसती.