गुहागर : शासनाच्यावतीने २ मे ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा पर्यटन महोत्सवातील सहभागासाठी तालुक्यातील कलापथकांची निवड करण्यात येत आहे. यासाठी दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत भंडारी भवन सभागृहात निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रत्नागिरी येथे मे महिन्यात होणाऱ्या जिल्हा पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालुकानिहाय लोककला पथकांना आवाहन करण्यात येत आहे. विविध तालुक्यातून घेण्यात येणाऱ्या निवड चाचण्यांमधून दर्जेदार अशा निवडक कलापथकांनाच प्रत्यक्ष पर्यटन महोत्सवात सादरीकरणाची संधी मिळणार आहे. त्यासाठी दि. १६ एप्रिल रोजी गुहागर तालुक्यातील कलापथकांची भंडारी भवन येथे निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.तालुक्यातील इच्छुक कलापथकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या कलापथकांना सुयोग्य मानधन दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.प्रवेश घेण्यासाठी तालुक्यातील कलापथकांनी निवासी नायब तहसीलदार, गुहागर यांच्याशी संपर्क साधून दि. १० एप्रिलपूर्वी आपली नोंदणी करावी. (वार्ताहर)रत्नागिरी येथील पर्यटन महोत्सवात विविध कला प्रकारांमधून रंगत येणार. तालुका पातळीवरील निवड चाचणीतून कला कौशल्यांचा विकास शक्य. निवडलेल्या पर्यटक संघांना महोत्सवात संधी मिळणार. शासनाचा पर्यटन महोत्सव अधिक रंगतदार व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न सुरू.तालुकानिहाय लोककलापथकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू.
स्थानिक कलाकारांना सुवर्णसंधी!
By admin | Published: April 06, 2015 11:02 PM