शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

लोकमान्य टिळकांचे बालपणातील दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव्य!

By admin | Published: July 22, 2016 10:49 PM

टिळकांचा जन्म रत्नागिरीतच : पाठ्यपुस्तकातील दापोली तालुक्यातील चिखलीचा उल्लेख वगळला; स्मारक पुरातत्व खात्याच्या ताब्यात--लोकमान्य टिळक जयंती विशेष

मेहरुन नाकाडे -- रत्नागिरी --पाठ्यपुस्तकातून लोकमान्य उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखली गावात झाल्याचा उल्लेख आजवर सापडत होता. प्रत्यक्षात टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ साली रत्नागिरीत झाला. सध्या असलेल्या पाठ्यपुस्तकात ही सुधारणा करण्यात आली आहे. रत्नागिरी शहरातील गोरे यांच्या घरात टिळकांचा जन्म झाला. इतकेच नव्हे तर बालपणातील दहा वर्षे त्यांचे वास्तव्य रत्नागिरीत राहिले आहे. राज्य संरक्षित असलेले टिळक स्मारक सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून, पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.लोकमान्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची १८५५मध्ये रत्नागिरीत बदली झाली. सध्याची नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे त्यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे गोरे नामक स्थानिकांनी आपले घर त्यांना भाड्याने दिले. पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर तसेच अन्य खोल्या मिळून खाली ९ व वरच्या मजल्यावर ३ असे दुमजली प्रशस्त घर दिले. माजघराला लागूनच असलेल्या खोलीत टिळकांचा जन्म झाला. त्यामुळे जन्मखोली म्हणून त्याचे जतन करण्यात आले आहे. टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक, शैलेश टिळक, मुक्ता टिळक यांनी टिळकांच्या काही वस्तू संग्रहालयाकडे जमा केल्या आहेत. एका काचेच्या कपाटात या वस्तू जपून ठेवल्या आहेत. मात्र, तत्पूर्वी टिळकांची पगडी तेवढीच या घरात होती. टिळकांचे प्राथमिक शिक्षण शाळा क्रमांक २ मध्ये झाले. १८६६ साली टिळकांच्या वडिलांची बदली पुण्यात झाली. त्यामुळे संपूर्ण टिळक कुटुंब पुण्यात राहावयास गेले. त्यामुळे टिळकांचे वास्तव्य असलेल्या या घराला २०० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. महाराष्ट्र शासनाने १९७६मध्ये अंतिम अधिसूचना काढली. लोकमान्य टिळकांचे वास्तव्य असलेले घर ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले. सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ते होते. मात्र, त्यानंतर १९८२-८३मध्ये पुरातत्व विभागाकडे याची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. तेव्हापासून हे स्मारक पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३०पर्यंत ते पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. आठवड्यातून एकदा सोमवारी हे स्मारक बंद ठेवण्यात येते. एक एकर जागेत लोकमान्य टिळकांचे घर, स्मारकाच्या आवारात टिळकांचा पुतळा व त्यावर मेघडंबरी बांधण्यात आली आहे. स्मारकाच्या समोर शोभेची झाडे लावण्यात आली असून, स्मारकाच्या मागे पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासखोल्या बांधण्यात आल्या आहेत. येथे पर्यटकांसाठी प्रसाधनगृहदेखील आहे. आत्तापर्यंत लाखो पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली आहे. येथील टिळकांचा पुतळा १९९८-९९ साली बांधण्यात आला तर मेघडंबरी २००६-०७ साली उभारण्यात आली. पुरातत्व विभागाने या स्मारकाच्या स्वच्छतेसह डागडुजीसाठी खास कर्मचारी नियुक्त केले आहेत.नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या भेटीटिळक स्मारकाला पर्यटकांबरोबर नामवंत मंडळींनी भेटी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कै. गोपीनाथ मुंडे, लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक, त्यांच्या पत्नी मुक्ता टिळक, डॉ. दीपक टिळक, खासदार नजमा हेपतुल्ला, योगगुरू रामदेवबाबा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांनी भेटी दिल्या आहेत. पर्यटनाच्या हंगामामध्ये दररोज ७०० ते ८०० पर्यटक येथे भेट देतात. तर आॅफ सिझनमध्ये १५० ते २०० पर्यटक दररोज येथे भेट देतात.काय पाहाल स्मारकात ?टिळकांचा जन्म ज्या खोलीत झाला तेथे टिळकांची पगडी, उपरणे, मानपत्राची फे्रम, अडकित्ता, पानाची पिशवी (चंची), नाणी, टाग, दिवा (कंदील), नावाची पाटी आदी वस्तू काचेच्या कपाटात ठेवण्यात आल्या आहेत. स्वयंपाकघरात तांब्याचे तपेले ठेवण्यात आले आहे. टिळक कुटुंब राहात असलेले घर दुमजली प्रशस्त आहे. खाली ९ व वरच्या मजल्यावर ३ खोल्या आहेत.