कणकवली : लोकमत ‘सिंधुदुर्ग’ आवृत्तीच्या नवव्या वर्धापनदिनी आयोजित स्नेहमेळाव्यात मान्यवर, वाचक व हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानिमित्ताने ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘सिंधुरत्न’ या विशेषांकाचे प्रकाशन सकाळी येथील प.पू. भालचंद्र महाराज आश्रमात व सावंतवाडी विभागीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.लोकमत सिंधुदुर्ग आवृत्तीचा नववा वर्धापनदिन सोहळा कणकवली येथील जिल्हा कार्यालयासमोर मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, प्रा. अनिल फराकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील मोरे, विश्वजित कार्इंगडे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, संपादक वसंत भोसले, सामाजिक बांधीलकीतून ‘ल् जाहिरात व्यवस्थापक राम जोशी, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष साखरे, सहायक सरव्यस्थापक (निर्मिती) बाजीराव ढवळे, सहायक शाखा व्यवस्थापक अतुल कामत, सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘फेरफटका’ सदरासाठी लिखाण करणाऱ्या प्रा. अनिल फराकटे यांचा पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)ोकमत’ची पत्रकारिता सामाजिक बांधीलकीतून पत्रकारितेत काम करणाऱ्या ‘लोकमत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा नववा वर्धापनदिन आनंददायी आहे. निव्वळ पत्रकारितेच्या पुढे जात विविध उपक्रम राबवत आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून ‘लोकमत’ काम करते. समाजाच्या सर्व घटकांना दिशा देण्याचे काम ‘लोकमत’कडून होत आहे, अशा शुभेच्छा जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी दिल्या. माध्यमांतील दोष दूर करणे आवश्यक संपादक वसंत भोसले यावेळी म्हणाले की, माध्यमांमधील दोष दूर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘लोकमत’चा नेहमीच प्रयत्न राहिला. विषयापासून भरकटत जाणे हा विशेषत: इलेक्ट्रॉनिक मीडियाचा दोष आहे. अभ्यासपूर्ण मांडणी करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. जेव्हा चौथा स्तंभ लोकांबरोबर राहतो, तेव्हा या स्तंभाची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील अपप्रवृत्तींवर टीका करताना जे चांगले आहे त्याला चांगले म्हटले पाहिजे, त्याचबरोबर चांगले घडविण्याचाही प्रयत्न हवा. महिलांचा यथोचित सन्मान नगराध्यक्षा माधुरी गायकवाड म्हणाल्या की, अल्पावधीत ‘लोकमत’ने वाचकांमध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. ‘लोकमत’ सामाजिक उपक्रमांत सक्रिय असते. अत्याचारांमुळे शारीरिक व्यंग आलेल्या महिलांचा सत्कार करण्याचा उपक्रम आपणास भावला.विशेषांकाचे कौतुकयावेळी ‘लोकमत’च्यावतीने नवव्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘लोकमत’ने वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘सिंधुरत्न’ विशेषांकाचे कौतुक जिल्हाभरातील वाचकांमधून दिवसभर होत होते.
‘लोकमत’ वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव !
By admin | Published: February 15, 2016 11:52 PM