वेंगुर्ले : विक्रमवीर सचिन तेंडुलकर याने क्रिकेट खेळातून करियर घडविले. त्याचप्रमाणे त्याच्यापासून प्रेरणा घेत जिल्ह्यातील खेळाडूंनी खेळाकडेच करियर म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन क्रीडा अधिकारी स्रेहल पाटील यांनी क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले. क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जागृती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे जिल्हास्तरीय क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत १८ डिसेंबरपर्यंत विविध गटातील स्पर्धा होणार आहेत. या सप्ताहाचे उद्घाटन येथील क्रीडा संकुलामध्ये स्नेहल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर जागृती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर, क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर, आदी उपस्थित होते. परबवाडा शाळा नं. १ च्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. संजय मालवणकर यांनी क्रीडा सप्ताहाबद्दल माहिती दिली.उद्घाटनप्रसंगी आयोजित केलेल्या एकता दौड स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या क्रीडा सप्ताहात कबड्डी, मॅरेथॉन, सायकल स्पर्धांचे आयोजन केले आहे.भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकार व विविध खेळांचे मार्गदर्शन, भारतीयम् कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या क्रीडा सप्ताहाचा समारोप १८ डिसेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)१० वर्षांखालील गटात - प्रतीक मालवणकर, इशा वाघमारे, १२ वर्षांखालील गटात - अजेंद्र मुळीक, पवन कांबळे, भूषण मालवणकर, १४ वर्षांखालील गटात- प्रबल बिराजदार, वैभव सकपाळे, १६ वर्षांखालील गटात - विपुल कदम, साईल मोबारकर, महम्मद नदाफ, मुलींच्या १२ वर्षांखालील गटात - जान्हवी परब, गायत्री परब, प्रीती टेमकर, ४१४ वर्षांखालील गटात - उत्कर्षा पाटील, मारुती आंदुर्लेकर, दिशा नवार, समिधा काळसेकर, १६ वर्षांखालील गटात - गंगा वालावलकर, ईशा नवार, दिशा चव्हाण, चैताली पवार, हर्षाली राऊळ, रिद्धी सावंत यांनी यश मिळविले.
खेळाकडे करियर म्हणून पाहावे : स्नेहल पाटील
By admin | Published: December 15, 2014 7:56 PM