सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील महाळुंगे गावात लम्पी रोगामुळे मागील पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी पडली. पशू वैद्यकिय विभागाचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. आज तिसरा बळी विष्णू राणे यांच्या बैलांचा गेला. त्यामुळे त्यांचे जवळपास २५००० रुपयांचे नुकसान झाले.दरम्यान, जिल्ह्यात लम्पी साथीने थैमान घातले असून ग्रामीण भागातील शेकडो जनावरे बाधित आहेत. मात्र जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात अनेक कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त असल्याने त्याचे विपरीत परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. लसीकरण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. त्याचबरोबरीने पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना करून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी जोर धरत आहे.
सिंधुदुर्गात लम्पीचे थैमान, पंधरा दिवसात तीन जनावरे मृत्युमुखी, महाळुंगे गावात शेतकरी त्रस्त
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 18, 2023 12:34 PM