शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

सिंधुदुर्गात पुन्हा लम्पीचा उद्रेक, पशुपालक चिंतित 

By ओमकार संकपाळ | Published: August 08, 2023 1:17 PM

जुलै महिन्यात दहा जनावरांचा मृत्यू 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, जिल्ह्यातील काही भागांत या आजाराचा उद्रेक झाला आहे. सध्या ३०० जनावरे या आजाराने बाधित असून, त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार सुरू आहेत. तसेच जुलै महिन्यात तब्बल दहा जनावरांचा मृत्यूदेखील या आजाराने झाला आहे. पशुसंवर्धन विभागाने लसीकरणावर भर दिला असून, आतापर्यंत ५५ हजार गो-वर्गीय जनावरांना लम्पीची लस देण्यात आली आहे.नोव्हेंबर २०२२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. यावेळी जिल्ह्यातील अनेक भागांतील जनावरे लम्पी या रोगाने आजारी पडली होती; मात्र, अन्य जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या जिल्ह्याच्या आधीपासून असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील गो-वंशीय जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात केली होती.जिल्ह्यातील २ लाख ५० हजार जनावरांपैकी १ लाख ५ हजार गो-वंशीय जनावरांना ही लस देण्यात आली होती. असे असले तरी नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील १२३ जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला होता; मात्र, आता पुन्हा या आजाराने जिल्ह्यात डोके वर काढले असून, पशुपालक चिंतित झाले आहेत.एका महिन्यांत दहा जनावरांचा मृत्यूगतवर्षी या लम्पीमुळे जिल्ह्यातील १२३ गो-वंशीय जनावरांचा मृत्यू झाला होता. तर चालू वर्षात आतापर्यंत १९ जनावरांचा मृत्यू झाला असून, यातील तब्बल दहा जनावरांचा मृत्यू हा जुलै या एका महिन्यात झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला असून, गो-वंशीय जनावरांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.लहान वासरांना धोका अधिक

जिल्ह्यात लम्पी साथीचा उद्रेक होत आहे. गेल्या वर्षी या आजाराची लस अन्य जनावरांना दिली असल्याने त्या जनावरांस या आजाराचा धोका कमी आहे; मात्र, जी जनावरे गाभण होती. त्यांच्यापासून निर्माण झालेल्या लहान वासरांना या आजाराचा धोका सर्वांत जास्त असून अशा वासरांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.

जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लस द्यावी. काही पशुपालक ही लस देण्यास नकार देत आहेत; मात्र, त्यांनी तसे न करता जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस द्यावी. - डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग