कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार नितेश नारायण राणे यांच्याकडे स्थावर व जंगम अशी मिळून ११ कोटी ३ लाख ८२ हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीच्या नावे ६ कोटी ३२ लाख ८४ हजार ६९७ रुपये एवढी मालमत्ता आहे.तर वरवडे येथे नितेश राणे यांच्या नावे ३ लाख २५ हजार २७८ रुपये एवढी वडिलोपार्जित संपत्ती आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यांत व कोर्टात त्यांच्यावर ३८ गुन्हे प्रलंबित असल्याचे नितेश राणे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.नितेश राणे यांनी वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांचे ४२ लाख ९२ हजार ६४० रुपये, तर त्यांच्या पत्नीचे २३ लाख ३८ हजार ७८० रुपये एवढे उत्पन्न असल्याचे आयकर विभागाकडे नोंदवले आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम ५४ हजार, पत्नीकडे ३६ हजार, तर मुलगा निमिषकडे २७ हजारांची रोकड आहे. नितेश राणे यांच्या नावे बँकेच्या ठेवी ४९ लाख ९३ हजार ४०५ रुपये, तर पत्नीच्या नावे ४३ लाख ९१ हजार ४२० रुपये आणि मुलगा निमिषच्या नावे १ लाख ३३ हजार २३० रुपये एवढ्या ठेवी आहेत.नितेश राणे यांच्या नावे पोस्टात (एनएसएस) ९३,०८६, पत्नीच्या नावे ५६ लाख ७४ हजार ३२०, तर मुलाच्या नावे १४ लाख ४८८ रुपये आहेत. नितेश राणेंकडे शेअर्स, बॉण्ड ६८ लाख ४७ हजार २३८, तर पत्नीकडे १ कोटी २६ लाख शेअर्स, बॉण्डस् आहेत. नितेश राणे यांच्या नावावर ६ कोटी ५० लाख ३७ हजार २१६ रुपये, तर पत्नीच्या नावावर ७८ लाख ४१ हजार ५००रुपये एवढे कर्ज आहे. नितेश राणेंकडे १ कोटी ४७ लाख ४४ हजार ४१० रुपयांचे सोने, तर पत्नीकडे १ कोटी ४४ लाखाचे सोने असल्याचे उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
नितेश राणे यांच्याकडे ११ कोटी ३ लाखांची मालमत्ता, नावावर किती गुन्हे.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 5:12 PM