शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: October 30, 2024 5:18 PM

निवडणूक निर्णय अधिकारी आल्या बाहेर

कुडाळ : विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच बुधवारी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसीलदार कार्यालयाच्या गेटवरच महायुती आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही गटांतील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते.कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज सुनावणीवेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेत त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. ज्याची खोटी सही मारल्याचा आक्षेप होता त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एका तासाचा वेळ दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र करण्यासाठी संबंधित सूचक तहसीलदार कार्यालयात आले असता प्रांत कार्यालयाच्या मुख्य दरवाजातच दोन्ही गट एकमेकांना भिडले.

निवडणूक निर्णय अधिकारी आल्या बाहेरज्यावेळी हे दोन्ही गट एकमेकांना भिडले त्यावेळी सुरुवातीला तेथे कोणी पोलिससुद्धा उपस्थित नव्हते. काही वेळाने पोलिस दाखल झाले. मोठा आरडाओरडा ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसेदेखील आपले चेंबर सोडून त्याठिकाणी तातडीने आल्या. दरम्यान, पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर मात्र, तहसील कार्यालयाच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kudal-acकुडाळMahayutiमहायुतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024