महेश सरनाईकसिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या भरघोस यशानंतर दक्षिण कोकणातील टोकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुतीची पकड घट्ट असल्याचे सिद्ध करण्यासाठी महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये तीन पैकी दोन जागा उद्धवसेनेकडे होत्या. आता शिवसेना पक्षफुटीनंतर तीन पैकी दोन जागा जिंकून शिंदेसेना वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहे. भाजपाने आपली हक्काची एक जागा निवडून आणण्यावर समाधान मानले आहे. महाविकास आघाडीसाठी जिल्ह्यातील निवडणुकीचा पेपर कठीण असला तरी उद्धवसेनेने तिन्ही जागांवर उमेदवार देऊन शिंदेसेना आणि भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- महायुतीमध्ये राणे यांच्या घरात तीन पैकी दोन तिकीट मिळाल्यामुळे घराणेशाहीचा आरोप होत आहे.
- महायुतीमध्ये सावंतवाडीत बंडखोरी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसतो हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- मालवण राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, हा कळीचा मुद्दा आहे.
- परप्रांतीय मच्छिमारांकडून सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील हद्दीत घुसखोरी सुरू असून माशांची लूट केली जात आहे.
- काजूला हमीभाव मिळावा या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेविधानसभा मतदारसंघ - मतदान - विद्यमान आमदार - पक्ष - मिळालेली मतेकणकवली - ६६% - नितेश राणे - भाजपा - ८४,५०४कुडाळ - ६३% - वैभव नाईक - शिवसेना - ६९,१६८सावंतवाडी - ६४% - दीपक केसरकर - शिवसेना - ६९,७८४
नीलेश राणे शिंदेसेनेतमहायुतीमध्ये कुडाळ मतदारसंघ शिंदेसेनेच्या वाट्याला गेल्याने याठिकाणी माजी खासदार नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
मतदान २०१९ मध्ये६७% मतदान विधानसभेसाठी होते२३ उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात नशीब आजमावले. १७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.