महेश सरनाईकसिंधुदुर्ग : पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा आमदार झालेले नितेश राणे राज्य नेतृत्वाचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे भाजपाचे प्रवक्ते म्हणून हिंदुत्वाचा नारा घेऊन ते कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीत हॅट्ट्रीक करण्यासाठी ते सज्ज असताना उद्धवसेनेने २०१४ साली त्यांच्यासमवेत काँग्रेसमध्ये असणाऱ्या संदेश पारकर या त्यांच्या साथीदारालाच रिंगणात उतरविल्याने कणकवली मतदारसंघातील निवडणूक आता चुरशीची बनली आहे.मागील निवडणुकांचा इतिहास पाहता हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राणेंनी २०१४ साली येथे काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदारकी पटकाविली. ती वगळता या मतदारसंघात कायमच भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. कणकवलीचे पहिले नगराध्यक्ष असलेले पारकर आता राणेंची हॅट्टीक रोखतात की ? राणे बालेकिल्ला शाबूत ठेवतात. याकडे लक्ष लागून राहिले आहे.निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- महायुतीकडून भाजपाचे आमदार नितेश राणे यांची उमेदवारी भाजपाच्या पहिल्या यादीत जाहीर झाली. मात्र, उद्धवसेनेकडून संदेश पारकर यांचे नाव शेवटच्या यादीत आले.
- या मतदारसंघात उद्धवसेनेकडून अतुल रावराणे, सुशांत नाईक, सतीश सावंत अशी इच्छुकांची मोठी फळी होती. त्यामुळे आता यातील रावराणे नाराज असल्याने ते अद्याप प्रचारात सक्रिय झालेले नाहीत.
- आमदार नितेश राणे हे मुस्लिमविरोधी भूमिका घेत असल्याने या मतदारसंघातील मुस्लिम समाजबांधव महाविकास आघाडीसमवेत राहू शकतो.
- नितेश राणेंविरोधी उद्धव ठाकरेंची तोफ येत्या १३ तारीखला कणकवलीत धडाडणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा पारकर यांना होणार काय ? हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.
२०१९ मध्ये काय घडले?नितेश राणे - भाजप (विजयी)८४,५०४सतीश सावंत- शिवसेना५६,३८८