सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेला पाठींबा अवघ्या दोन दिवसात काढून घेतल्यानंतर आता निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात वंचित ने ट्विस्ट आणला असून थेट अपक्ष उमेदवार विशाल परब यानाच पुरस्कृत केल्याने सर्वानाच धक्का बसला असून वंचित आता परब यांचा प्रचार करणार आहे.याबाबत चे पत्र वंचित च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिले आहे.
सावंतवाडी मतदार संघात वंचित च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना जाहीर पाठींबा दिला होता.पण हा पाठींबा देताना वंचित च्या पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना विश्वासात घेतले नाही.असे म्हणत पाठींबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.त्यामुळे वंचित ची भुमिका काय असाच प्रश्न कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पडला होता.
पण निवडणूक संपता संपता सावंतवाडीच्या राजकारणात ट्विस्ट निर्माण केला असून वंचित च्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी स्वता पत्र काढून थेट अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पाठींबा जाहीर केला या पाठीब्याचे पत्र जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी परब यांना दिले असून त्यामुळे परब यांचे पारडे जड झाले आहे.दरम्यान वंचित ने घेतलेल्या या भुमिकेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून वंचित ने शेवटच्या टप्यात का पाठींबा दिला याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. या पाठीब्या वरून परब यांनी वंचित चे आभार मानले आहे.