संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 01:12 PM2021-12-26T13:12:00+5:302021-12-26T13:12:22+5:30

सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये, बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते : अजित पवार

maharashtra deputy cm ajit pawar slams bjp nayan rane over co-operative banks election sindhudurga | संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला नाही; अजित पवारांचा राणेंना टोला

Next

सिंधुदुर्ग : सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला. शिवराम भाऊ, डी.बी.ढोलम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बॅक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते, असं पवार म्हणाले.

 "ज्यांच्या नेतृत्वाखालील बॅकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही," असं म्हणत अजित पवारांना नारायण राणेंना टोला लगावला. खासदार, आमदार होणे सोपे पण बँकेची निवडणूक लढवणे अवघड आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे असून येथे स्पर्धा मोठी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

"विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. दादागिरी दहशतीला घाबरू नका," असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. मात्र निवडणुकीत गाफिल राहू नका असं आवाहनही पवार यांनी केलं. योग्य व्यक्तीच्या हातात बॅक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असंही ते म्हणाले. या दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर आठवड्या पूर्वी हल्ला झाला होता. ते हल्ल्यातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

"शरद पवारांचा आदर्श घ्या"
केंद्र सरकारची राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. "कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बॅक जिंकायची आहे. शिवराम भाऊंनी केलेले काम प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल याचा मला विश्वास आहे," असं सतेज पाटील यावेळी म्हणाले.

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar slams bjp nayan rane over co-operative banks election sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.