कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीमध्येभाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या आक्रमकतेविषयी भाष्य केले.
नितेश राणे आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेच्या सभागृहात असताना त्यांनी कोकणाचा विषय आक्रमतेने मांडला. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर नितेश राणेंच्या रूपात आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व समोर येईल. तसेच, त्यांना आमच्या शाळेत आणल्यानंतर आक्रमकतेबाबत संयम बाळगण्याचे धडे शिकवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. याशिवाय, कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील. इतर सगळ्या उमेदवारांना मिळून 30 टक्के मते मिळतील. हे माझे भाकीत आहे. तुम्ही डायरीत लिहून घ्या, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच, नारायण राणेंशी सुरुवातीपासूनच माझे चांगले संबंध होते. नारायण राणेंनी विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमक काम केले होते. विरोधी पक्षात असताना त्याचे मार्गदर्शन सुरुवातीपासूनच लाभले. आज राणेंचा संपूर्ण परिवार भाजपावासी झाला आहे, त्याचा खूप आनंद झाला आहे. नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा फायदा पक्षाविस्तारासाठी होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-- नारायण राणेंसोबत भरपूर काम केले आहे.- आक्रमक विरोध पक्षनेता म्हणून मी त्यांना पाहिले आहे.- स्वाभिमान परिवार आमचा झाला. राणेंच्या नेतृत्वाचा फायदा होईल.- नितेश आक्रमक, संयमी नेतृत्व म्हणून पुढे येतील. - महाराष्ट्र कुठेही चुरस नाही.- जिंकणारे लोक आहोत शांततेने वागा.- मागील निवडणुकीत ४२ होते आता २४ येतील.- राहुल गांधी लोकसभेत भाषण करायचे तेच करत आहेत.-जनादेश मोदींसोबत आहे.- पाच वर्षांत ३० हजार किलोमीटर रस्ते तयार केले.-रोजगाराचा मार्ग असणार आहे-सिंधुदुर्ग मोठ्या प्रमाणावर काम केले.-चिपी विमानतळ सुरू होईल.- सी वर्ल्ड प्रकल्प येत्या दोन वर्षात काम सुरू करू.-सिंधुदुर्गात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ-कोकणातील वाहून जाणारे पाणी अडवून कोकण टँकर मुक्त करू.-एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी २०२२ पर्यंत प्रयत्न