शिवसेना- भाजप युती 2024 मध्येतुटणार असून त्याची नांदी ही कणकवलीतुन झाली आहे. सिंधुदुर्गातील युती तोडण्याचे काम शिवसेनेने केले असून त्याचा शेवट भाजप करणार आहे असा इशारा ही माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत दिला.
भाजप नेते संदेश पारकर व अतुल रावराणे यांनी पुढील दोन दिवसात नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी व्हावे अन्यथा पक्षाचा सरळ राजीनामा द्यावा नाहीतर त्यांची नाविलाजाने हाकलपट्टी करावी लागेल असे ही जठार यांनी सांगितले. तसेच नाणार प्रकल्पला भविष्यात राणे यांचा विरोध असणार नाही त्याच अटीवर पक्षात घेण्यासाठी मी हिरवा कंदील दिल्याचेही ही जठार यांनी सांगितले. राणेंचा भाजप प्रवेश हा शिवसेनेमुळेच रखडला होता आता ते रीतसर भाजपमध्ये आले आहेत त्यामुळे कोकणात भविष्यात भाजप हाच एक नंबरचा पक्ष असेल