शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कणकवली राणेंचीच! नगराध्यक्षपद आणि 11 जागांवर बाजी मारत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राखले निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 11:10 AM

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने

सिंधुदुर्ग - माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी कणकवली शहरावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने नगराध्यक्षपदासह  17 पैकी 11 जागांवर विजय मिळत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी भाजपाच्या संदेश पारकर यांना पराभवाचा धक्का दिला. भाजपा आणि शिवसेना आघाडीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले.   

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि शिवसेना-भाजपा युतीने सर्वस्व पणाला लावल्याने कणकवली नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय जगताचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत 11 जागा जिंकत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जोरदार मुसंडी मारली. मात्र नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची झाली. कणकवली शहरात बऱ्यापैकी वर्चस्व असलेले संदेश पारकर यांच्यासमोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समीर नलावडे यांनी कडवे आव्हान उभे केले होते. अखेर या निवडणुकीत नलावडे यांनी अवघ्या  37 मतांनी बाजी मारत पारकरांना पराभवाचा धक्का दिला. 

नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीतील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती आणि ती लढाई पुन्हा एकदा राणेंनी जिंकून त्यांच्या विरोधकांना धूळ चारली आहे. नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. असे असताना राणे यांनी कणकवलीत भाजपा विरोधातच दंड थोपटले होते. त्यामुळे राणे यांचा विजय होतो की भाजपाचा? हे पाहणे औत्सुक्याचे होते. कणकवली नगरपंचायत निवडणूक ही सिंधुदुर्गच्या राजकारणाची दिशा ठरविणारी होती. नारायण राणे यांना विरोध म्हणून शिवसेनेने येथे भाजपाशी युती केली होती.  कणकवली नगरपंचायतीच्या १६ नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ एप्रिलला मतदान झाले. तर प्रभाग १० मध्ये बुधवार ११ एप्रिलला मतदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी १२ एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. पहिल्या फेरीपासूनच स्वाभिमानने नगरसेवक निवडून आणण्यात मोठी आघाडी घेतली होती. यात पहिल्या फेरीत ६ पैकी ५ जागा स्वाभिमानने पटकावल्या.  स्वाभिमानला सर्वाधिक जागाकणकवली नगरपंचायतीच्या १७ जांगापैकी स्वाभिमान पक्षाला सर्वाधिक १0 जागा मिळाल्या. तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. त्यामुळे स्वाभिमान-राष्ट्रवादीच्या आघाडीला ११ जागा मिळाल्या. त्यानंतर शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत.  संदेश पारकर अवघ्या ३७ मतांनी पराभूतनगराध्यक्ष पदासाठी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा स्वाभिमान-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांनी अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीची नगराध्यक्ष पदाची लढाई अपेक्षेप्रमाणे अत्यंत अटीतटीची झाली.  कणकवलीमधील प्रभागानुसार निकाल प्रभाग क्र. १ - कविता राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष ), प्रभाग क्र. २ - प्रतीक्षा सावंत (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र. ३ - अभिजित मुसळे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र. ४ - आबिद नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग क्र. ५ - मेघा गांगण (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र. ६ - सुमेधा अंधारी (भाजप) प्रभाग क्र. ७ - सुप्रिया समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र. ८ - उर्मी योगेश जाधव (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र. ९ - मेघा सावंत (भाजप), प्रभाग क्र. १० -  माही परुळेकर (शिवसेना), प्रभाग क्र. ११ -  विराज भोसले (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष), प्रभाग क्र.१२ -  गणेश उर्फ बंडू हर्णे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)  प्रभाग क्र. १३ - सुशांत नाईक (शिवसेना)  प्रभाग क्र. १४ -  रुपेश नार्वेकर (भाजप) प्रभाग क्र. १५ - मानसी मुंज (शिवसेना) प्रभाग क्र. १६ - संजय कामतेकर (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) प्रभाग क्र. १७ -  रवींद्र गायकवाड (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र