Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात प्रचारसभांना सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आज कोकणात सभा आहेत. ठाकरे यांनी आज कोकणातील पहिल्याच सभेत खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. काही दिवसापूर्वी खासदार राणे यांनी कोकणात येताना हेलिकॉप्टरने नको, रस्त्याने या',अशी टीका केली होती. या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.
'पवारांनी शिवसेना फोडली'; छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी सोडलं मौन, काय दिलं उत्तर?
सिंधुदुर्ग येथील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपलं सरकार आल्यानंतर बऱ्याच गोष्टी करणार आहे. आज यांनी महिलांबाबत घोषणा केल्या आहेत. मोदीजी तुम्ही १५ लाख देणार होता मग १५०० का देत आहे?, असा सवालही ठाकरेंनी केला. आता यांच्या योजना येत आहेत. आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता. तुम्हाला आम्हाला नव्हता, लोकसभा निवडणुकीत यांना फटका दिल्यानंतर यांना लाडकी बहीण आठवली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर केली.
"मला मध्ये कोणीतरी आव्हान दिले की हेलिकॉप्टरने येऊ नका, रस्त्याने या. होय मी रस्त्यानेच येतो आणि रस्त्यानेच जातोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता केली. पुतळा पडल्यानंतर ही शिवदृोही माणस आदित्य ठाकरे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर ठणाणा करत बसली होती. ही लोक शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत, असंही ठाकरे म्हणाले. आमच्यावर आरोप करा ते राजकारण आहे. पण तुमची काळीकृती ती आजपर्यंत खूप झाली. गेल्यावेळी यांचे घोडे गंगेत नाहले, पण ही चूक पुन्हा करु नका, असंही ठाकरे म्हणाले.
बंडखोरी ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे
ठाकरे म्हणाले, काहीजण बंडखोरी करत आहेत. ती बंडखोरी नाही, ती महाराष्ट्रासोबत केलेली गद्दारी आहे. जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी हे पाप करु नये. व्यक्तिगत स्वप्नासाठी बंडखोरी करु नका. बंडखोरी म्हणजे महाराष्ट्रासोबत केलेली गद्दारी आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दीपक केसरकरांवर निशाणा
उद्धव ठाकरे म्हणाले, दीपक केसरकर तर खाली मुंडी आणि पातळधुंडी आहे. २०१४ मध्ये चांगला माणूस म्हणून आव आणला होता. मोदी स्वतः या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आले मात्र ते निवडणुकीसाठी होतं, दाढीवाला म्हणाले पुतळा वाऱ्याने कोसळला, केसरकर पुतळा कोसळला चांगलं झालं म्हणाले, मात्र केसरकर पडल्यानंतर महाराजांचा चांगला पुतळा होईल, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.