शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
4
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
5
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
6
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
7
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
8
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
9
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
10
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
11
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
12
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
13
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

महाविकास आघाडीने राडा घडवून आणला; आम्ही ठरवले असते तर एकही मागे गेला नसता - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:21 PM

स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी पैशाने बनविला त्या उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा ठेवणार?

मालवण : राजकोट किल्ल्याचे ठाकरे गटाने दगड पाडले ते माजी खासदार नीलेश राणे यांनी लावले. या पवित्र स्थळाचे दगड पाडणारे ठाकरे हे महाराज द्रोही आहेत. महाविकास आघाडीने हा राडा घडवून आणला. आम्हाला जर काही करायचे असते तर यातील एकही मागे गेला नसता, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. राजकोट येथील राड्यानंतर खासदार नारायण राणे माध्यमांशी बोलत होते.राणे म्हणाले, आम्ही राजकोट किल्ला येथे जाऊन घटनेची पाहणी करून येत होतो. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वातावरण खराब करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर आम्ही आमच्या जागेवरच उभे राहिलो. यांनी एखादी शाळा तरी काढली का? मंदिर तरी उभारलं का? फक्त महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करतात. स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी पैशाने बनविला त्या उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा ठेवणार? शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही माहिती नाही.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक भांडवल करीत आहेत. महाराजांचा पुतळा कोसळणे हे निमित्त करून सर्व जण एकत्र येऊन टीका करत आहेत. बाहेरून आलेले पुढारी, गेल्या आठ महिन्यांत पुतळा उभारल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला आले नाही. आता पुतळा कोसळल्यानंतर केवळ राजकारण करून भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

लवकरात लवकर नवीन पुतळा उभारूमहायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट झाला. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एक तरी उद्योग आणला का? अशा माणसाने टीका करण्याचे धाडस करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर पुतळा उभारण्याचे प्रयत्न असतील, असे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनाराShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarayan Raneनारायण राणे Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी