सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी सावंतवाडीत खरेदी विक्री संघावर भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेने 15 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत महाविकास आघाडीची धुव्वा उडवला.हा खरेदी विक्री संघ अनेक वर्ष शिवसेने कडे होता.मात्र आता तो भाजप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ताब्यात आला आहे.
सावंतवाडी खरेदी विक्री संघ हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्वाचा मानला जातो. कोकणात प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या निमित्ताने भाजप ने आठ जागावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने सात जागांवर उमेदवार उभे करून युतीच्या माध्यमातून श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल मैदानात उतरवले होते.तर महाविकास ने सहकार वैभव पॅनल मैदानात उतरवले होते. या दोघांची देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनेल ची थेट लढाई सहकार वैभव पॅनेल शी झाली यात युतीचे श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनेल चे 15 ही उमेदवार निवडून येत त्यांनी संघावर वर्चस्व प्रस्थापित केले.यात भटक्या विमुक्त मधून दत्ताराम कोळमेकर हे पहिल्यांदाच बिनविरोध निवडून आले होते.तर उर्वरित चौदा जागांसाठी शनिवारी सकाळी येथील कळसुलकर हायस्कूल च्या हाॅल मध्ये मतदान पार पडले तर सायंकाळी लागलीच मतमोजणी झाली.
यात युतीच्या पॅनेल ने वर्चस्व प्रस्थापित केले यात संस्था मतदार संघात युतीचे प्रवीण देसाई (२७), आत्माराम गावडे (२७), दत्ताराम हरमलकर(२७), प्रभाकर राऊळ (२६), रघुनाथ रेडकर(२५), प्रमोद सावंत (२६) यांचा विजय झाला.तर व्यक्ती मतदार संघात प्रमोद गावडे (३२५ ), शशिकांत गावडे ( २८६ ), ज्ञानेश परब ( २९६ ) व विनायक राऊळ ( २७८ ) यांचा विजय झाला.महिला मतदासंघात युतीच्या आनारोजीन लोबो ( ३२१ ) व रेश्मा निर्गुण (३२० )यांनीही विजय संपादन केला. इतर मागास वर्ग मतदार संघात युतीचे नारायण हिराप ( ३३२ ) हे तर अनुसुचित जाती जमाती मतदार संघातही भगवान जाधव ( ३३९ ) हे विजयी झाले आहेत.विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवीसह राजन तेली राजन म्हापसेकर,महेश सारंग संजू परब मनोज नाईक गुरूनाथ पेडणेकर,अशोक दळवी,बाबू कुडतरकर आदि सावंतवाडीत दाखल झाले होते.