शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘अ‍ॅप’मुळे महावितरण गतिशील

By admin | Published: February 14, 2017 9:49 PM

दहा लाख ग्राहकांकडून वापर : कामकाजात सुधारणा

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ सात महिन्यांत सुमारे दहा लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला असून, सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीज जोडणी अर्ज, वीज बिलांची माहिती व बिलांचा भरणा वीज सेवांविषयी तक्रारी व अभिप्राय, आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आलेले नाही त्यांना अ‍ॅपद्वारे मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांची सोय झाली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र अ‍ॅप’ डाऊनलोड केले असून, याद्वारे नवीन वीज जोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीज मीटरचे रीडिंग, फिडर व डीटीसी मीटर रीडिंग, आदी कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात गती आली आहे. (प्रतिनिधी)एक कोटींवर : ग्राहकांची नोंदमहावितरणच्या सुमारे एक कोटी चार लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून, या ग्राहकांना मीटर रीडिंग, वीज बिल, आॅनलाईन बिल, नवीन वीज जोडणीसाठी अर्ज व त्याची सद्य:स्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे, आदींबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.