मालवण : जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यास वैचारिक पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. पत्रकारांच्या प्रामाणिक भूमिकेमुळे सिंधुदुर्गात पर्यटनासह अन्य विकासासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, महसूल प्रशासनाचा संथ कारभार विकासाच्या मार्गात अडथळा ठरत आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. तालुका पत्रकार समितीच्या वतीने २०१४-१५मधील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांचे वितरण मामा वरेरकर नाट्यगृहात शुक्रवारी पार पडले. यावेळी खासदार राऊत बोलत होते. यावेळ आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष अशोक तोडणकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर, राजेंद्र प्रभूदेसाई, हरी खोबरेकर, भाजपचे भाऊ सामंत, गुरू राणे, विजू केनवडेकर, महादेव पाटकर, आगोस्तीन डिसोजा, उमेश मांजरेकर, दीपक मयेकर, योगेश पटकारे, जयश्री हडकर, पत्रकार राजा खांडाळेकर, प्रफुल्ल देसाई, विकास गावकर, विनोद दळवी, कुणाल मांजरेकर, परेश राऊत, मनोज चव्हाण, अमित खोत, कृष्णा ढोलम, मंगेश नलावडे, सिद्धेश आचरेकर, गणेश गावकर, भूषण मेथर, अर्जुन बापार्डेकर, परेश सावंत, उदय बापार्डेकर, भाऊ भोगले, संतोष गावडे, अमोल गोसावी, संतोष हिवाळेकर, झुंजार पेडणेकर, उमेश शिरोडकर, आदी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त पत्रकार प्रशांत हिंदळेकर, महेश कदम, अनिल तोंडवळकर, नितीन गावडे, छायाचित्रकार समीर म्हाडगुत, राजेश पारधी यांना गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष बंटी केनवडेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर महाजन, निवेदक सौगंधराज बांदेकर, सचिव विनोद दळवी, प्रफुल्ल देसाई यांनी पत्रकारांसाठी शासनाकडून सोयीसुविधा मिळाव्यात, अशी आग्रही मागणी केली. यावेळी पुरस्कारप्राप्त प्रशांत हिंदळेकर, महेश कदम, समीर म्हाडगुत यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान
By admin | Published: February 12, 2016 10:03 PM