वेंंगुर्ले : चांगल्या गुणांबरोबरच चांगले आचरण ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करा, असा संदेश ज्येष्ठ समाजसेविका मीराताई जाधव यांंनी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. पणदूर येथे आयोजित केलेल्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्र्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मीराताई जाधव व सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योगपती पुष्कराज कोले कोकितकर, माजी नगरसेविका श्वेता हुले, मख्याध्याजक संजय मालवणकर, प्राचार्य सातोसे, संस्थेचे कांदळकर, गावडे, प्रकाश परब, शेखर सामंत, आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनीही आपल्या मनोगतांतून सिंधुदुर्गची गुणवत्ता विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी पुष्कराज कोले, शशिकांत अणावकर, आनंद जामसंडेकर, अद्वैत देसाई, सागर सामंत यांनाही आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभामध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांकास लॅपटॉप व रोख रक्कम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रिस्ट वॉच व स्मृतिचिन्ह देऊन मीराताई जाधव व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, शिक्षण, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश घाटवळ यांनी सूत्रसंचालन केले. शेखर सामंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महिलांनी सजगता बाळगावीसमाजातील भ्रष्टाचार थांबायचा असेल तर त्याची सुरुवात पालकांनीच स्वत:पासून करणे गरेचे आहे. शिवाय यासाठी प्रत्येक महिलेनेही सजगतेने यामध्ये योगदान द्यावे, असे मत मीराताई जाधव यांनी व्यक्त केले.
गुणवत्तेतून देशाचे नाव उज्ज्वल करा
By admin | Published: June 28, 2015 11:23 PM