शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

महामार्ग चौपदरीकरणाचे काम दर्जेदार करा : विनय देशपांडे यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 6:52 PM

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे महामार्ग चौपदरीकरणाचे काम दर्जेदार करा : विनय देशपांडे यांचे आदेशपरशुराम उपरकर यांच्या सोबत पाहणी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रत्येक ठेकेदाराला दर्जेदारच करावे लागेल. या रस्त्याची १५ वर्षांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम करता येणार नाही. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी दर्जेदार काम होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी दिले आहेत.कणकवली येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या पाहणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी विनय देशपांडे आले होते. यावेळी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, त्याचप्रमाणे कणकवलीतील नागरिकांनी त्यांची भेट घेऊन काम सुरू असताना होणाऱ्या त्रासाबद्दलचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकारी अभियंता प्रकाश बनगोसावी, उपअभियंता प्रकाश शेडेकर, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यादव, मनसेचे संतोष कुडाळकर, अनिल राणे, दत्ताराम बिडवाडकर, प्रमोद राणे, संतोष सावंत, निखील आचरेकर, कणकवलीतील नागरिक अनंत पारकर, बबली राणे, प्रदीप मांजरेकर आदी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत परशुराम उपरकर यांनी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे देशपांडे यांच्या निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. याचीही कल्पना त्यांना दिली. बांधकाम करताना योग्य पद्धतीचे स्टील वापरले जात नाही अशी तक्रारही यावेळी केली.परिवर्तीत मार्ग हे डांबरी असणे आवश्यक आहेत. मात्र, कच्चे रस्ते करून अपघातास निमंत्रण दिले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर विनय देशपांडे यांनी जी कामे निकृष्ट असतील त्यांची फेरचौकशी करण्याच्या सूचना प्रकाश शेडेकर यांना दिल्या आणि ते काम उखडून काढून त्याठिकाणी पुन्हा स्लॅब घातले जावे, ज्या रस्त्यांना तडे गेलेले आहेत तो रस्ता खोदून पुन्हा काँक्रिटने केला जावा अशा विविध सूचना यावेळी दिल्या.जिल्हा परिषदेची परवानगी आवश्यक!कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी हलवावा याकडे परशुराम उपरकर यांनी विनय देशपांडे यांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या हद्दीत हा पुतळा ठेवण्यासंदर्भातही त्यांनी सल्लामसलत केली. यावेळी देशपांडे यांनी जिल्हा परिषदेची जागा असेल तर तशी परवानगी त्यांच्याकडून आपल्याला घ्यावी लागेल, असे यावेळी सांगितले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर