शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

मारेकऱ्याला पकडण्यासाठी बनाव

By admin | Published: December 15, 2014 10:17 PM

शिक्षक संघटनेचा आरोप : पोलीस ठाण्यातच आंदोलन करणार

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस प्रशासनाचा कारभार पोखरला गेला असून मारेकऱ्यांना पकडण्यासाठी बनवाबनवी पोलीस करीत आहेत. चार दिवसांपूर्वी सुबोध वराडकर यांना मारहाण केलेल्या मारेकऱ्याचा येत्या दोन दिवसात छडा न लावल्यास शनिवारी मोर्चा काढून मारेकऱ्याला पकडेपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघटनेचे कोकण परिषदेचे विभाग अध्यक्ष सुधाकर तावडे यांनी दिला.चार दिवसांपूर्वी येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल शाळेतील शिक्षक सुबोध वराडकर यांना शाळेच्या आवारात येऊन दिनेश जाधव याने मारहाण केली होती. याप्रकरणी सोमवारी शाळेच्या सभागृहात झालेल्या निषेध सभेत तावडे बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत काटे, शिक्षक सचिन तकिलदार, दिगंबर पावसकर, विलास कासकर, संजय बांगर, अजयकुमार बेकनाळकर, वाय. पी. नाईक, एम. पी. मानकर, तृप्ती पार्सेकर, मनीषा कदम आदी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कळसुलकर शाळेतील नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चार दिवसांपूर्वी सुबोध वराडकर यांच्या बाबतीत गैरवर्तन केले होते. याचा जाब त्यांनी त्या विद्यार्थ्यास विचारला होता. तर विद्यार्थ्याने शिक्षकांनी आपणास मारहाण केली असून आता उलट्या होत असल्याचे पालकांना सांगितले होते. त्यामुळे दिनेश जाधव याने सुबोध वराडकर यांना शाळेच्या आवारात येऊन मारहाण केली होती. या प्रकरणी शिक्षकांनी जाधव याच्या विरोधात तक्रार दिली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध का लावत नाहीत, असा प्रश्न तावडे यांनी केला. यावेळी तावडे म्हणाले, पोलीस एका दिवसात जाधवचा शोध घेऊ शकतात. परंतु पोलिसांचा कारभार पोखरला गेला असल्याचे सांगून तावडे यांनी पोलीस प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. शिक्षक हा शासनाचा कर्मचारी असून पोलीसही शासनाचेच कर्मचारी आहेत. परंतु शासनाचे एक खाते दुसऱ्या खात्याला मदत करीत नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे शिक्षक पेशा खवळल्यास काय करू शकतो, ते मोर्चातून दाखवून देण्यात येईल, असा इशारा यावेळी तावडे यांनी दिला. शिक्षण परिषदेची स्थापना ही कळसूलकर इंग्लिश स्कूल या शाळेतूनच झाली आहे. त्यामुळे या शाळेच्या शिक्षकाला न्याय मिळणे आवश्यक आहे. कायदा हातात घेऊन शिक्षकाला अमानुषपणे मारहाण होते, ही घटना निषेधास्पद असल्याचे तावडे यांनी सांगितले. मुख्याध्यापक चंद्रकांत काटे म्हणाले, शिक्षकाला मारहाण काळीमा फासणारी गोष्ट आहे. घटनेची दखल घेऊन सुधीर वराडकर यांना पाठबळ दिल्याबाबत त्यांनी शिक्षक संघटनेचे आभार मानले. शिक्षकांनी मारहाण झाल्यावर मारेकऱ्यांच्या दडपणाखाली न राहता त्यांच्या विरोधात तक्रार करणे आवश्यक आहे. त्याचे समर्थन न करता वेळीच सावध राहणे गरजेचे असल्याचे सलीम तकीलदार यांनी सांगितले. (वार्ताहर)