शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मालवण पर्यटकांनी फुलले, हजारोंची गर्दी, सलग सुट्यांमुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला सर्वाधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 4:06 PM

सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - सलग सुट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मालवणी भाषेत यवा कोकण आपलाच आसा असे म्हणण्याची वेळ आता राहिलेली नाही. कारण देश, परदेशासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मालवण आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाले आहेत. गेले दोन दिवस शेकडो वाहनांनी मालवण व्यापून गेलेय. परिणामी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवत आहे.समुद्रकाठचे पर्यटन आता देशभरासह परदेशातही आघाडीवर आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर प्रत्येक बिच लोभसवाणे आहे. त्यामुळे या भागात एकदा आलेला पर्यटक आपण स्वतःच पुढच्या आपल्या दौऱ्यात आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन यायचं प्लॅन करतो आणि दौऱ्यावर आल्यावर पुढच्या दौऱ्याचे नियोजन केले जाते.तारकर्ली, देवबागाला सर्वाधिक पसंतीपर्यटनात मालवणचे नाव घेतलं की तारकर्ली आणि देवबाग या जोडगोळीचे नाव पुढे येणारच. कारण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे पर्यटक निवास बांधले आहेत. तर स्थानिक तरुण आणि उद्योजकांनी घर तेथे जेवण, राहण्याची व्यवस्था करत पर्यटकांसाठी कमी पैसात समुद्र सान्निध्यात राहण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने पर्यटक या भागाला पसंती देत आहेत.ऑनलाईन बुकिंगला पसंतीसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी २० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत आगाऊ बुकिंग केले आहे. अचानक मालवणच्या दौऱ्याचा बेत आखाला तर राहण्यासाठी हॉटेल्स मिळणे कठीण आहे.पर्यटन वाढले, अपेक्षाही वाढल्याफेसाळणाऱ्या लाटा आणि नयनरम्य किनारा अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी मालवण किनारपट्टीवर भेट देत आहेत. सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओढा विचारात घेता स्थानिकांनी शासनाच्या योजनांची वाट न बघता पर्यटन व्यवसायातून रोजगार निर्मितीवर भर देत पदरचे पैसे घालून मोठ्या दिलाने पर्यटन व्यवसाय उभा केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी व्यापकता वाढत गेली. पर्यटन वाढले, पर्यटकांच्या अपेक्षाही वाढल्या.सिंधुदुर्ग पर्यटनाची पंढरीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वेगळाच आनंद देऊन जाते. येथे असलेली जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण खाद्यसंस्कृती, लोककला आदींची भुरळ पर्यटकांना नेहमीच पडते. पर्यटकांना नानातऱ्हेचे साहसी खेळ उपलब्ध करून स्थानिकांनी पर्यटकांशी नाते निर्माण केले. यातूनच दरवर्षी पर्यटन बहरत आहे. पर्यटकांनी मालवणसह, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्याला पसंती दिल्याने पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदुर्ग राज्यात प्रथम क्रमांकांचा जिल्हा ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण