महेश सरनाईक, मालवण (सिंधुदुर्ग): मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी (एम एच २० बी एल २९५८) या एसटी बसचा कुपेरीची घाटी उताराच्या वळणावर चालत्या बसचा स्टेरींग लाँक झाल्याने सकाळी ६.१५ वाजण्याच्य दरम्यान भिषण अपघात झाला. या अपघातात चालक सांगळे यांच्यासह आठ जण जखमी झाले असून यातील चालक सांगळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते. ही बस कुपेरेची घाटी येथे आली असता अचानक बसचे स्टेरींग लाँक झाल्याने एसटी १२ फूट दरीत कोसळली. यात रस्त्याच्या बाजुला कोसळत दोन वेळा पलटी होत एसटी उभी राहिली.सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली असून अपघातात मालवण आगारातील चालक सांगळे हे जखमी झाले असून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर वाहक देशमुख व इतर प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
पहाटे अपघात झाल्याने मार्गावरुन जाणाऱ्या वहानचालक तसेच कुणकावळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मालवण आगाराचे व्यावस्थापक आणि कर्मचारी चालक यांनीही अपघातस्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली.