मालवण : मालवण पालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रभाग पद्धतीने ज्या निवडणुका झाल्या होत्या. त्या दोन प्रभागांचा एक असे सात प्रभाग तर १५, १६ व १७ या तीन प्रभागाचा आठवा प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. विद्यमान नगरसेवकांबरोबरच काही माजी नगरसेवकांसाठी ही प्रभाग रचना अनुकूल मानली जात आहे. दरम्यान, जाहीर करण्यात आलेली ही प्रभाग रचना पालिकेच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर १४ जुलै हरकत नोंदविण्याची अंतिम तारीख असणार आहे. प्रभाग १ : धुरीवाडा समुद्रकिनारपट्टी, सेवांगण ते कुरण, कोळंब रस्ता ते साळसकर स्मशान आडारी खाडीपर्यंत, आडारी साकव पूल ते चंडिका मांड आरोलकर घर व्हाळी मार्गाने खंडाळेकर घर तिठापर्यंत पूर्व उत्तर भाग तर चंदू मांजरेकर घर मोरे कम्पावुंड ते महापुरुष पाणंदपासून गणेश करंगुटकर घर, तसेच धनू मडये घरापासून गायकवाड घर ते पुन्हा सेवांगण रस्ता किनारपट्टी अशी प्रभाग १ व २ ही प्रभाग एकची रचना आहे. प्रभाग २ : रेवतळे चंडिका रस्ता तुकाराम हडकर घरापासून रेवतळे शाळेसमोरील खोत घर ते आडारी साकव, व खाडीलगतच्या भागपर्यंत, देऊळवाडा व्हाळपर्यंत उत्तर भाग. तर देऊळवाडा पालिका हद्दीपासून सातेरी पापडी पुलापर्यंत ते रामेश्वर मंदिर परिसरापासून पेट्रोल पंपमार्गे रेडकर हॉस्पिटल दक्षिण भाग. रेडकर हॉस्पिटलबाजूने कांबळी घरापासून फाटक घर पुन्हा चंडिका मांड रस्त्यापासून आरोलकर घरालगत. प्रभाग ३ व ४ ही प्रभाग दोनची रचना आहे. प्रभाग ३ : चिवला बीच रस्ता सेवांगणपासून गायकवाड घराजवळून कीर पाणंद हडकरघरापर्यंत येथून केळूसकर घर ते ढोलम सर व रस्त्यासमोरील सरमळकर घर तिठा, आरोलकर हद्दीपासून रेवतळे फाटक रस्त्यापर्यंत, वैद्य फाटक रस्त्याने शेतमळ्यातून कुडाळकर हायस्कूल समोर रेडकर दवाखान्यापर्यंत तेथून पुन्हा भरड नाका ते नगर परिषद कार्यालय फोवकांडा पिंपळ व फोवकांडा पिंपळ ते माघी गणेश चौक ते पंतवालावलकर रस्त्याने चिवला बीच अशी प्रभाग ५ व ६ ही प्रभाग तीनची रचना आहे. प्रभाग ४ : शासकीय विश्रामगृहकडील भाग ते चिवला बीच पर्यंत, तेथून माघी गणेश चौक, पिंपळपार ओटवणेकर घर ते नेवाळकर गल्लीपासून पंचायत समितीच्या हद्दीने पिंपळपारपर्यंत. नाईक घर तिठा महात्मा गांधी रस्त्याने मालक तिठा रस्त्यापासून पिराची भाटपर्यंत. अशी प्रभाग ७ व ८ ही प्रभाग चारची रचना आहे. प्रभाग ५ : डॉ. सातोसकर तिठा ते राममंदिर रस्ता प्रभू घर, पंचायत समिती हद्दीने ओटवणेकर घर ते मॅकेनिकल रस्ता रेवंडकर घर, बावकर पाणंद, भंडारी हायस्कूल हद्दीने न्हावी गल्ली ठाकूर दुकानापर्यंत सोमवारपेठ रस्ता बॉम्बे टेक्स्टटाइल ते बल्लव रस्ता श्याम पोलिस चौकी किनाऱ्यापर्यंत. तेथून समुद्री हद्दीपासून पिराची भाट, मुजावर घर काळबादेवी रस्त्याने शहाबुद्धीन मुल्ला घर ते मंत्री घरापर्यंत. अशी प्रभाग ९ व १० ही प्रभाग पाचची रचना आहे. प्रभाग ६ : सोमवारपेठ रस्ता बॉम्बे टेक्स्टटाइल, बांदेकर पाणंद ते न्हावी गल्ली ठाकूर दुकान, भंडारी हायस्कूल हद्दीने दामले घर ते भरड नाका व तेथून भरड नाका ते सोमवार पेठ स्मशानभूमी रस्ता, सावंत घर भोसले पाणंदपर्यंत तेथून गर्देरोड पूल कीर पाणंद, पिंटो घर शेतमळ्यातून मकरेश्वर व्हाळी स्मशान रस्त्यापर्यंत व तेथून बांदेकर घर श्याम पोलीस चौकीपर्यंत. अशी प्रभाग ११ व १२ ही प्रभाग सहाची रचना आहे.प्रभाग ७ : भरड नाका ते देऊळवाडापूल नारायण मंदिरापासून पालिका हद्दीपर्यंत, देऊळवाडा हद्द व्हाळाच्या बाजूने आडवण हद्द ते वायरी प्रमुख रस्त्यापर्यंत. तर वायरी-देवली जोडरस्ता ते परुळेकर घर मुख्य रस्ता, तानाजी नाका ते गावकरवाडा मुस्लिम मोहल्ला तिठा ते भरड नाकापर्यंत अशी प्रभाग १३ व १४ ही प्रभाग सातची रचना आहे. प्रभाग ८ : सोमवार पेठ स्मशानभूमीपासून बांदेकर रस्ता ते गदेर्रोड कामाक्षी नर्सिंग होम, भोसले पाणंद ते परुळेकर घरापर्यंत. वायरी मुख्य रस्ता परुळेकर घर ते परब घरापर्यंत. तानाजी नाका ते देवली रस्ता पालिका हद्द. चव्हाण दुकान शेतमळ्यातून केळबाई मंदिर ते कोकरे घरापर्यंत व पुढे मोरेश्वर समुद्रापर्यंत. दांडी किनारपट्टी मोरेश्वरपासून सोमवारपेठ स्मशान रस्तापर्यंत अशी वार्ड १५, १६ व १७ ही प्रभाग आठची रचना आहे. (प्रतिनिधी)
मालवण नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर
By admin | Published: July 07, 2016 12:02 AM