सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 150(1755), सावंतवाडी - 130(1886.10), वेंगुर्ला - 131.60(1417.40), कुडाळ - 90(1512), मालवण - 157(1920), कणकवली - 71(1784), देवगड - 65(1543), वैभववाडी - 84(1753), असा पाऊस झाला आहे.जिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंबजिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प व कोर्ले - सातांडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 370.5250 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.82 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून एकूण 175.410 घ.मी. प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.उपलब्ध पाणीसाठा मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 61.9720, अरुणा झ्र 39.5112, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.6099, ओटाव झ्र 1.3530, देंदोनवाडी झ्र 0.6840, तरंदळे झ्र 0.5240, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.7050, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.8720, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 1.2350, दाभाचीवाडी झ्र 1.8410, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.3300, कारिवडे झ्र 1.3770, धामापूर झ्र 2.2910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 1.0340, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.8220, शिरगाव झ्र 0.7890, तिथवली झ्र 1.6980, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 12:58 PM
Rain Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 109.82 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1696.31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊसजिल्ह्यातील 14 लघु पाटबंधारे प्रकल्प तुडुंब