शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

देणमध्ये आंबा, काजू बाग आगीत खाक

By admin | Published: January 16, 2015 11:10 PM

५0 लाखांची हानी : ३४ एकर क्षेत्र आगीत भस्मसात; विद्युत वाहिनी तुटल्याने आग

फुणगूस : संगमेश्वर तालुक्यातील खाडीभागातील देण-धनगरवाडा येथे महावितरणची ४४० विद्युतभारित वाहिनी तुटून आंबा व काजू बागेवर पडल्याने लागलेल्या आगीत ३४ एकर क्षेत्रांतील ३५०० काजू कलमे, १०० आंबा कलमे आणि पाच लाखांचा ठिबक सिंचन प्रकल्प जळून खाक झाले. घटनास्थळी आलेले महावितरणचे कर्मचारी आणि शाखा अभियंत्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. जोपर्यंत वरिष्ठ येथे येऊन पाहणी करून पंचनामा करत नाहीत, तोपर्यंत येथून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने सायंकाळपर्यंत पंचनामा होऊ शकला नाही. या आगीत ४० ते ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथून जवळच असलेल्या देण गावातील धनगरवाडा परिसरात कातळी जमिनीवर प्रसाद काशीनाथ मुळ्ये, कृष्णा मेवे, तसेच दिलीप देसाई यांनी आंबा-काजूची बाग फुलवली होती. आज, शुक्रवारी याच बागेवर महावितरणची वाहिनी तुटून आग लागली.दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास धनगरवाडा भागातील ‘बिवळाचा सखल’ या भागातून धुराचे प्रचंड लोळ बाहेर पडत असल्याचे देण ग्रामस्थांच्या नजरेस पडले. भयंकर अशा आगीने संपूर्ण परिसरालाच वेढा घातला होता. वारा अन् कडकडीत ऊन असल्याने आग चारही बाजूला वेगाने पसरली होती. प्रसाद मुळ्ये, कृष्णा मेवे, देसाई यांच्याबरोबर शेकडो ग्रामस्थ मदतीला धावले. (वार्ताहर)हलगर्जीपणाच कारणीभूतमहावितरणची ४४० दाबाची विद्युत वाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली होती. याची कल्पना वर्षभरापूर्वी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ही तार तुटून पडली. या आगीत ३४ एकरच्या जागेमधील ३५०० काजू कलमे जळून खाक झाली. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचे ठिबक सिंचन योजनाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बाजूच्या शेतातील १०० हापूस आंबा कलमांना या आगीचा फटका बसला. महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळेच एवढे मोठे नुकसान झाले.