शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

आंबा, काजू पिकांवर अवकाळी संकट - ढगाळ वातावरण : बागायतदारांची तारेवरची कसरत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 5:19 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

-प्रथमेश गुरव । वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलीकडे पडलेल्या अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांना हंगामाच्या प्रारंभीच फटका बसला आहे. अशाप्रकारच्या अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे आंबा व काजू पिकांवर परिणाम होण्याची भीती असून, त्यामुळे आंबा व काजू बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

साधारणत: पाऊस आटोक्यात आल्यानंतर दसरा, दिवाळी या सणांमध्ये आंबा-काजू बागायतदारांमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाते. त्यानुसार नवीन बागा विकत घेणे किंवा करारावर घेणे तसेच जुन्या बागांचा करार वाढवून घेणे आदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आता घेतलेल्या बागांची स्वच्छता करणे, आंबा कलमांवर आलेली बांधा काढणे अशी कामे बºयापैकी बागायतदारांनी उरकून घेतली. काही ठिकाणी आंबा कलमांवर औषधांची पहिली फवारणी झाली असून काही बागांमध्ये औषध फवारणीचे काम सुरु आहे. त्यासाठी कित्येक स्थानिक तरुण, मध्यमवयीन पुरुष बागांमध्ये राबत आहेत. हे सर्व चालू असताना अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने बागायतदारांपुढे संकट निर्माण झाले आहे.शासनाकडून मात्र उपेक्षाआतापर्यंत अनेक वेळा आंबा बागायतदारांना वेगवेगळ्या समस्येचा सामना करावा लागला आहे. आंबा पीक कधी कधी धोक्यातही येते. पण शासनाकडून मदत मिळत नाही. वेगवेगळ््या घोषणा फक्त केल्या जातात. प्रत्यक्षात शेतकरी,  आंबा बागायतदार उपेक्षितच राहतो. आंबा पिकांना विमा संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच कृषी विभागानेही आंबा पीक जास्तीत जास्त यावे यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच अडीअडचणीच्या काळात आंबा बागायतदारांच्या मागे उभे राहणेही गरजेचे आहे. मात्र सर्व स्तरावर शासनाकडून आंबा बागायतदारांची उपेक्षाच होत असते.कोकणातील शेतकरी मागे पडतोकोकणात फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. पण हे आंबा पीक काही कारणांनी धोक्यात आल्यास त्याकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नसतो. शासनस्तरावरही दखल घेतली जात नाही. या उलट विदर्भ, मराठवाडा येथे कोणतेही पीक धोक्यात आले तर शासन त्यांच्या पाठीशी उभे राहते. मात्र आपला शेतकरी शासनाशी भांडत नाही आणि येथील राजकीय नेतेही शासनाकडे भांडण्यात कमी पडतात. त्यामुळे शेतकरी कमी पडतो.हलक्या पावसामुळे अशाप्रकारे आंबा पिकावर करपा व तुडतुड्या रोगाची शक्यता आहे.पानावरील करपा मोहोरावरील करपाआंब्यावरील तुडतुडे

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग