आचरा (सिंधुदुर्ग) : मालवण तालुक्यातील पळसंब गावठाणवाडी येथील जयंत पुजारे यांच्या बागेला लागलेल्या आगीत त्यांची धरती नऊ कलमे जळून मोठे नुकसान झाले. ही आग विद्युत जनित्रातुन झालेल्या शार्ट सर्किट मुळे झाल्याचे ग्रामस्थांचे मत असून चिरेखाणी लगत असलेली डीपी तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पळसंब गावठाण वाडी येथील चरेखाणी लगत असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपी वरून शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत जयंत पुजारे यांची ९ हापूस आंबा कलमे जळून खाक झाली. तसेच या आगीमुळे सडा भागातील गवत जळून मोठे नुकसान झाले आहे. कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ गावा बाहेर असल्याने आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. यामुळे ही आग अधिक पसरत गेली.
जयंत पुजारे यांचे या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा महसूल यंत्रणेमार्फत करण्यात आला आहे. यावेळी सरपंच महेश वरक, तलाठी जाधव, ग्रामसेवक कांबळे, कर्मचारी अणावकर, माजी उपसरपंच सुहास सावंत, माजी सदस्य अरुण माने उपस्थित होते.