शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

दर्जाहीन औषध पुरवठ्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी संकटात

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: January 24, 2024 3:41 PM

कीटकनाशकांची तपासणी तज्ज्ञ पथकाकडून व्हावी; मालवण तालुका आंबा बागायतदार, व्यापारी यांची आग्रही मागणी

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदार, व्यापाऱ्यांना फवारणीसाठी मिळणारी औषधे ही दर्जाहीन स्वरूपात मिळत असल्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. तुडतुडे, थ्रिप्स आदी कीड व कीटक रोगांना दूर ठेवण्यासाठी लाखो रुपयांची औषधी खरेदी करूनही त्याची परिणामकारकता मिळत नसल्याचे चित्र आहे.याबाबत कृषी विभागाने बाजारात विक्रीस असलेल्या औषधांची तपासणी करावी, त्याबरोबरच शासनाने यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करून संकटात असलेल्या आंबा बागायतदारांना दिलासा द्यावा. अशी मागणी मालवण तालुका आंबा बागायतदार आणि आंबा व्यापारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.दरम्यान, शासनाने आंबा बागायतदारांची व्यथा समजून घेऊन या बागायतदार, व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार स्वरूपातील औषधे अनुदान स्वरूपात मिळण्याबाबत कृषी विभागामार्फत पावले उचलावीत. अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.मालवण तालुका आंबा बागायतदार आणि व्यापारी यांनी मंगळवारी सायंकाळी भरड दत्त मंदिर येथे पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. यावेळी आप्पा चव्हाण, सुधीर मांजरेकर, जगदीश गावकर, संदीप गावकर, सिजर डिसोजा, मधुकर लुडबे, राजन लुडबे, दीपक शिंदे, राहुल सावंत, सचिन कांबळी, जयवंत लुडबे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

कीडरोगाचे प्रमाण वाढलेगेल्या काही वर्षांत सतत हवामान बदलाचा फटका आंबा व्यवसायाला बसत आहे. अवकाळी पाऊस, बदलता थंडीचा कालावधी, काही वेळा वाढणारा प्रचंड उष्मा या सर्वांमुळे आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. त्यासोबतच विविध कीटक व कीड रोगाचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र या हवामान बदलामुळे दिसून येते. त्यामुळे वारंवार फवारणी करण्याची वेळ सर्वच बागायतदारांवर आली आहे.

योग्य ती कार्यवाही करावीआंबा पिकाकडे कृषी विभागाने, अधिकारी वर्गाने ज्या गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अशी कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आंबा बागायतदार, व्यापारी मोठ्या संकटात असून मोठा आर्थिक फटकाही बसत आहे. शासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कृषी विभागाला आदेश देत योग्य ती कार्यवाही करावी. बाजारात मिळणारी कीटकनाशके यांचीही तपासणी तज्ज्ञ पथकाकडून करण्यात यावी, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा