शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आंबा हंगामावर पावसाचे पाणी, शेतकरी-बागायतदार अडचणीत; दर घसरले कर्जाचे हप्ते फेडायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 7:15 PM

मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेल्या काही दिवसात बदललेल्या नैसर्गिक वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरूवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या आंब्याच्या हंगामावर पाणी पडले आहे.गेल्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात अवकाळी पाउस पडला आहे. त्यामुळे शेतकरी, बागायतदारांसमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळून पडलेला अवकाळी पाऊस हा डोकेदुखी ठरतो. गेल्या वर्षभरात पावसाळ्याचे चार महिने वगळून प्रत्येक महिन्यात थोडा तरी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकरी, बागायतदारांना बसला आहे.

आंबा डागळला, दरही उतरणार

जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरूवात होते. यावर्षी अगदी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस होता त्यामुळे थंडीही लांबली होती. परिणामी आंबा हंगाम उशिराने म्हणजे एप्रिल, मे महिन्यातच सुरू होणार हे निश्चित होते. मात्र, मार्च महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे त्याचा परिणाम आंब्याच्या फळांवर झाला आणि आता आंबा मोठ्या प्रमाणावर डागळला आहे. त्यामुळे सध्या आंब्याचे दरही घसरले आहेत.

कर्जाचे हप्ते कसे फेडायचे ?मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका आंबा व्यवसायाला बसला होता. त्या काळात आंबा व्यावसायिकांनी विक्रीचे नवनवीन प्रयोग करून त्यातून कसा तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर्षी नैसर्गिक आपत्तीमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदारांच्या नाकीदम आणले. आंब्याचे फळच खराब झाल्यामुळे आता व्यवसाय कसा होणार? आणि बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न व्यावसायिकांना सतावत आहे.

शासनाने मदत करण्याची मागणी 

शासनाने आंबा, काजू बागायतदारांना आर्थिक मदत करावी आणि नैसर्गिक आपत्तीमधून वर काढण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी आंबा आणि काजू व्यावसायिकांमध्ये होत आहे. हे कोकणातील दोन महत्वाची उत्पन्नाची साधने आहेत. मात्र, तीच साधने निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून गेली आहेत. -प्रा. राजेंद्र मुंबरकर, फळ अभ्यासक, सिंधुदुर्ग

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीMangoआंबा