शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कचऱ्याच्या ठेक्यावरून आघाडी फुटली

By admin | Published: September 20, 2015 9:23 PM

ठराव ११ विरुद्ध ४ ने मंजूर : आघाडीच्या नगरसेवकांची साथ; एकाकी पडलेल्या नगरसेवक म्हाडगूत यांचा सभात्याग

मालवण : मालवण शहरातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना शहरातील प्रभाग १ व २ मधील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या मुदतवाढ विषयावरून पालिकेच्या सभेत वादळी चर्चा झाली. ठेकेदारास सुधारण्याची संधी देऊन मुदतवाढ द्यावी या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या सूचनेला नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर आचरेकर यांच्या सूचनेनुसार नगरसेविका महानंदा खानोलकर यांनी या विषयावर मांडलेल्या ठरावाला म्हाडगूत यांनी उपसूचना मांडली. पालिकेत पहिल्यांदाच लेखी स्वरूपात मांडलेल्या ठरावावरील उपसूचना ११ विरुद्ध ४ मतांनी फेटाळण्यात आली. मात्र, या ठरावानंतर म्हाडगूत सभात्याग करत सभागृहाबाहेर पडले. एकूणच सभेच्या सुरुवातीला शहर विकास आराखडा विरोधात एकमताने विरोध दर्शवला गेला. मात्र, सभेच्या अखेरच्या टप्प्यात घनकचऱ्याचा मुद्दा तापला आणि म्हाडगूत यांची साथ शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी सोडली अन् आघाडीही तुटली असे चित्र दिसून आले.मालवण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ३० मार्चनंतर तब्बल सहा महिन्यांनी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, महेश जावकर, महेंद्र म्हाडगूत, महानंदा खानोलकर, स्नेहा आचरेकर, संतोषी कांदळकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, रेजिना डिसोजा, पूजा करलकर, सेजल परब, नितीन वाळके, जॉन नरोना आदी उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील प्रभाग १ व २ येथील कचरा करणे व त्याची विल्हेवाट लावणे यासाठी ठेका पद्धतीने एका संस्थेस काम दिले आहे. त्याची मुदत जानेवारी २०१३ ला संपली. त्यानंतर अन्य ठेकेदार निविदा प्रक्रिया मागूनही उपलब्ध न झाल्याने त्याच संस्थेस मुदतवाढ देण्यात आली. मात्र या संस्थेने शहरात नागरिकांनी तोडलेली झाडी व अन्य कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याने व अन्य बाबींचा विचार करता दीर्घ मुदतीसाठी व काही रक्कम वाढवून ठेका मिळाल्यास अधिक चांगले काम करणे सोयीस्कर होईल असे पत्र दिले होते. त्यावर आचरेकर यांनी सभागृहाच्या अखत्यारित मुदतवाढ व १० टक्के रक्कम वाढवून देण्याची सूचना मांडली, तर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे काम चांगले नाही. वेळेत कचरा गोल करण्याशी अडचणी निर्माण होत आहेत असे सांगितले. यावर म्हाडगूत यांनी प्रभागातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिक नगरसेवकांना दोषी ठरवितात. आम्हाला ठेकेदाराबद्दल आक्षेप नाही. काम चांगले झाले पाहिजे. त्यामुळे तीन वर्षाची मुदतवाढ देण्यापेक्षा काही मुदतवाढ देवून नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया काढावी, याला आचरेकर यांनी आक्षेप घेतला. यावर दर्शना कासवकर यांनी ठेकेदाराचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असे मत मांडले. त्यानंतर घेण्यात आलेल्या मुदतवाढीच्या ठराव सूचनेवरील मतदानात काँग्रेसच्या आचरेकर, सौ. आचरेकर, केणी, पाटकर, खानोलकर, कांदळकर, वराडकर या सात नगरसेवकांसह आघाडीतील उपनगराध्यक्ष वराडकर, जावकर, गिरकर, कासवकर या चार नगरसेवकांसह ११ जणांनी ठरावाच्या बाजूने, तर म्हाडगूत यांनी मांडलेल्या उपसूचनेच्या बाजूने म्हाडगूत यांच्यासह करलकर, डिसोजा, परब यांनी मतदान केले. त्यामुळे मुदतवाढीचा ठराव ११ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला. आघाडीतील चार सदस्यांनी काँग्रेसच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने शहर विकास आघाडी फुटल्याचे दिसून आले, तर उपसूचना मंजूर न झाल्याने नगरसेवक म्हाडगूत यांनी सभात्याग करत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. (प्रतिनिधी)यावेळी सभेत इतिवृत्त वाचना दरम्यान आराखडा प्रसिद्ध झाला आहे, त्यात पालिकेतील ३० जुलैच्या ठराव क्रमांक १३९ नुसार बदल केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मुळात या सभेस कोणतेही बदल विचारात घेतले जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले. त्यानंतरही नगरसेवकांनी हरकती स्वरुपात ठराव केला. त्या ठरावातील कोणताही मुद्दा विचारात न घेता आराखड्यात ११ बदल करण्यात आले व ते या ठरावानुसार झाल्याचे दर्शविण्यात आले. सभेच्या माथी हे पाप मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे झारीतील शुक्राचार्याचा हात आहे असे नितीन वाळके यांनी सांगितले. यावर म्हाडगूत यांनी ठराव इतिवृत्तात वाचून तो अंतिम होण्यापूर्वी तो विचारात घेतलाच कसा असे सांगितले. तर मंदार केणी, महेश जावकर, पूजा करलकर, शीला गिरकर यांनीही आक्षेप नोंदविले. सुदेश आचरेकर यांनी या साऱ्या मागे प्रशासन म्हणजेच भाजपा सरकारचा डाव आहे. असे सांगत हा आराखडा अरबी समुद्रात बुडविला जाईल, असे सांगितले.