शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

जगात शिकवणारे बरेच, पण काम करणारे कमी; भास्करराव पोरे-पाटील यांची खंत 

By अनंत खं.जाधव | Published: October 30, 2023 5:36 PM

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका ...

सावंतवाडी : पूर्वी मावळे ३५ किलोची तलवार घेऊन फिरायचे आज माणसाचे वजन ३५ किलो भरत नाही. त्यामुळे आपल्या चुका सुधारा. काय करू नका हे सांगण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. माझ्या पाटोदा गावात ४० ठिकाणी हात स्वच्छता मशिन ठेवली असून या ठिकाणी थूंका असे फलक लावले आहेत. जगात शिकवणारे खूप आहेत, पण करणारे कोणीच नाही, अशी खंत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच भास्करराव पोरे-पाटील यांनी व्यक्त केली. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे रोटरी क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष सुहास सातोस्कर, सरपंचसंघटनेचे सुरेश गावडे, क्रीडाईचे अध्यक्ष निरज देसाई, दादा खोर्जुवेकर, सरपंच संघटने जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, प्रवीण परब उपस्थित होते. पोरे-पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकाळात कुठल्याही सुविधा नसताना माणसे शंभर वर्षे जगत होती. आता माणूस ६० वर्षे जगत आहे आणि लवकर त्याचे आयुष्यमान ४० वर्षांवर येईल. याला जबाबदार कोण? सर्व सुविधा असताना हे असे का घडते, याचा विचार प्रत्येक सरपंचांनी करणे गरजेचे आहे. आजार हे प्रामुख्याने गावात झाडे नसल्यामुळे होतात. झाडामुळे ऑक्सिजनची निर्मिती होते. एका माणसाला २८ किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड ७ किलो ऑक्सिजन निर्मिती करते आणि ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने  कोरोना काळात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि ही आपत्ती पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. असेही ते म्हणाले. माझ्या गावात मी सरपंच होण्यापूर्वी दोन दवाखाने होते. आज आमच्या गावात एकही दवाखाना नाही. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी गावात स्वच्छता पाहिजे, ड्रेनेजची गटार पाहिजेत. आरोग्य चांगले राहिले तर आयुष्य नक्कीच वाढेल. या सर्वांसाठी होणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग