सुधीर राणेकणकवली : दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत आहे. इंधन दरवाढीमुळे काही जण सायकलकडे वळत आहेत. परंतु, आता सायकलही परवडेनाशी झाली आहे. साधी सायकल घ्यायची म्हटले तरी सात हजारांपासून ते लाखापर्यंत किमती गेल्या आहेत.विविध कंपन्या आणि त्याचबरोबर विविध सुविधांमुळे किमतीत फरक आढळून येतो.
का वाढल्या किमती? - सायकल बनविण्यासाठी स्टील, रबर, ॲल्युमिनियम, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या. - डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला. - स्टीलची किंमत वाढली असून, अन्य कच्च्या मालाचेही दर वाढलेले आहेत, असे सायकल व्यावसायिक सांगतात.गियरच्या सायकलला मागणी!
जिल्ह्यात गियरच्या सायकलला सर्वाधिक मागणी असल्याचे सायकल व्यावसायिकांनी सांगितले. गियरच्या सायकलची किंमत ९ हजारांपासून ते ५० हजारापर्यंत आहे.
कोणती सायकल कितीला? (रुपयांत) साधी सायकल -७०००फॅन्सी सायकल- ८७०० इलेक्ट्रिक सायकल- २७०००गिअर सायकल-११५०० हायब्रीड सायकल- १३७८०
कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. त्यामुळे सायकलच्या किमतीत किंचितशी वाढ झाली आहे. - शैलेंद्र नेरकर, सायकल व्यावसायिक.