शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

Maharashtra Bandh : सिंधुदुर्ग जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 10:54 AM

मराठा समाजाच्या आंदोलकांनी मध्यरात्रीपासून टायर जाळून रस्ते बंद केले आहेत. 

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गमधील मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाला आहे. मध्यरात्रीपासूनच आंदोलन पेटलं असून ठिकठिकाणी टायर जाळून, झाडे तोडून रस्ते रोखण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आंदोलकांनी थांबविली असून जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. रिक्षा संघटनेनेही रिक्षा बंद करून आंदोलनात घेतला सहभाग आहे.

मराठा समाजाच्या आंदोलकांनी मध्यरात्रीपासून टायर जाळून रस्ते बंद केले आहेत. वेंगुर्ले-तुळसमार्गे सावंतवाडी व वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी हे दोन्ही महत्वाचे मार्ग आंदोलनकर्त्यांनी बंद केले आहे. रेडी-शिरोड्यात रात्रीपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली. रस्त्यावर झाडे, टायर जाळून वाहतूक ठप्प केली आहे. तालुक्यातील एसटी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. मातोंडमधील वस्तीची एसटी तुळस सुभाषवाडी येथे मध्यरात्री पंक्चर केली आहे. पेंडूर येथे मळेवाड-सावंतवाडी महामार्गावर भलीमोठी झाडे तोडून टाकल्यानं महामार्ग बंद आहे. तालुक्यासह शहरातही तणावाचे वातावरण आहे.

वस्तीच्या गाड्या अडकल्या

बांदयात रात्रीपासून अनेक ठिकाणी टायर जाळून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सकाळी ग्रामीण परिसरातून येणाऱ्या अनेक वस्तीच्या गाड्या अडकल्या आहेत. झाडे तोडून रस्ता बंद केल्यामुळे  विद्यार्थी व कामावर जाणारे अडकून पडले आहेत.पोलिसांची गस्त सुरू आहे.

कुडाळमध्ये दहा एसटी बस फोडल्या

कुडाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी एस.टी. च्या दहा बस फोडल्या. रात्री बारा वाजता मारूती ओमनीची तोडफोड करून ती जाळण्यात आली. माणगाव खोरे केले चक्काजाम करण्यात आले. आकेरी व झाराप रस्ता बंद करण्यात आला. माणगाव हायस्कूलमधील मुलांना सुरक्षित बाहेर काढून हायस्कूल बंद पाडण्यात आले. 'एक मराठा लाख मराठा'च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुंबई-गोवा महामार्गावर झाडे पाडून  चक्काजाम करण्यात आला. महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्काजाम यशस्वी

मराठा क्रांतीची कुडाळमध्ये भव्य रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. आमदार वैभव नाईक कुडाळ येथील एसआरएम चौकात उपस्थित झाले आहेत.

 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा