- अनंत जाधवसावंतवाडी : मॅरेस्टिका स्वॅम्प या दुर्मिळ वनस्पतीचा शोध सिंधुदुर्ग जिल्हयातील दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे लागला असून, ही वनस्पती भारतात दोन ठिकाणीच आढळून आली आहे. पूर्वी ती केरळ येथे सापडली होती. तर एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात सापडली आहे. ही वनस्पती असलेले बांबर्डेतील अडीच एकरचे क्षेत्र संरक्षित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याची अधिसूचनाही लवकरच निघणार आहे.मॅरेस्टिका स्वॅम्प ही दुर्मिळ वनस्पती दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे आहे. एक वर्षापूर्वी ही वनस्पती या परिसरात असल्याचा शोध लागला असून, अतिशय दलदलीच्या भागात ही वनस्पती आहे. राज्य सरकारचे सल्लागार अफरोझ अहमद यांनी एक वर्षापूर्वी या भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहाणी केली. त्यानंतर तसा अहवाल राज्य सरकारला दिला होता. राज्य सरकारने यांची विशेष दखल घेतली. भारतात दोनच ठिकाणी ही वनस्पती आढळून आली आहे. यात पूर्वी केरळचा उल्लेख केला जात असे तर आता ही वनस्पती दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे आढळून आल्याने शासनाने हा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.या भागाला राज्य सरकारने बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्र्धन राखीव क्षेत्र असे नाव दिले असून, हा अडीच हेक्टरचा परिसर संरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या वनस्पतीचा उपयोग कशासाठी केला जातो हे अद्यापपर्यत सांगण्यात आले नसून, ही वनस्पती अतिशय दुर्मिळ असल्यानेच ही संरक्षित करण्याचे शासनाने ठरविले असे सांगितले जाते. त्यामुळेच सिंधुदुर्ग वनविभगााचे सहाय्यक वनसंरक्षक आय. डी जलगावकर यांनी २० डिसेंबर रोजी बांबर्डे गावात जाऊन बैठक घेत ग्रामस्थांची चर्चा केली. ग्रामस्थही सकारात्मक असून, त्यांनीही या प्रस्तावास मंजूरी दिली आहे.त्या मुळे लवकरच हा परिसराचे संवर्धन होणार आहे. याबाबतचा अहवाल सिंधुदुर्ग वनविभागाने राज्यसरकारला पाठवला असून, लवकरच याबाबतची अधिसूचना राज्य सरकार काढणार आहे. बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्र्धन राखीव क्षेत्र असे नामकरणदोडामार्ग तालुक्यात बांबर्डे हे गाव असले तरी तेथून गोवा हा हाकेच्या अंतरावर आहे. ही वनस्पती बांबर्डेच्या जंगल परिसरात अतिशय दलदलीच्या भागात असून, वडा सारखीच ही वनस्पती दिसायला आहे, असे वन अधिकारी सांगतात. तिच्या पारंब्या ही जमिन पर्यत आहेत. या वनस्पतीमूळे बांबर्डेचे नामकरण बांबर्डे मॅरेस्टिका स्वॅम संवर्धन राखीव क्षेत्र असे करण्यात आले आहे. भविष्यात या वनस्पतीमूळे हा भाग पर्यटन दृष्ट्याही विशेष महत्व प्राप्त होणार आहे.
सिंधुदुर्गातील दोडामार्गात आढळली मॅरेस्टिका स्वॅम्प ही दुर्मीळ वनस्पती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:07 PM