सिंधुदुर्गनगरी दि. २६ : सीआरझेड अधिसूचना 2011 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे बनविण्याचे काम सेस, (उएरर) केरळ यांच्यामार्फत पूर्ण झालेले आहेत.
सीआरझेड अधिसूचना २0११ मधील परिशिष्ठ १, परिच्छेद क्रंमाक (अ) या तरतुदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे प्रसिध्द करणे व त्यावर ४५ दिवसात सूचना व हरकती मागविणे आवश्यक आहे.
४५ दिवस पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांनी त्या आठवड्यात जनसुनावणी घेवून सर्व सुचना व हरकती राज्य शासनास इंग्रजीत पाठविण्यात याव्यात, असे निर्देश संचालक, टउेटअ पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांनी त्यांच्याकडील पत्र क्र. एमसीझेडएमए २0१६/प्र.क्र.२२/तां.क.४ दिनांक २१ आॅगस्ट २0१७ अन्वये या कार्यालयास दिलेले आहेत.
त्याअनुषंगाने पर्यावरण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील अधिसूचना व त्यांनी या कार्यालयास पाठविलेले २१ प्रारुप आराखडे या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहेत.
या नकाशांचे अवलोकन करुन यासंदर्भात काही अभिप्राय अथवा हरकती असल्यास ४५ दिवसांचे आत म्हणजे ५ आॅक्टोबर २0१७ पूर्वी निम्न स्वाक्षरीत यांच्या कार्यालयाकडे अभिप्राय अथवा हरकती सादर कराव्यात.हे अभिप्राय अथवा हरकती पर्यावरण विभाग मुंबई यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात येणार आहेत. मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त होणा-या अभिप्राय-हरकती यांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाºयांनी केले आहे.