शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

आशिये बायपाससाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 5:03 PM

Muncipal Corporation Kankavli Sindhudurg: कणकवली शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील पोस्ट खात्याच्या जमिन भूसंपादनाचा प्रस्ताव महिन्याभरातजिल्हाधिकाऱ्यांकडे करणार सादर

कणकवली : शहरातील आशिये बायपास रस्त्यासाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पुढाकार घेतला आहे. याचाच भाग म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे.या भूसंपादनासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद नगरपंचायतने करून ठेवलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रस्तावाला मंजुरी देताच प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे.कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातून आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आशिये -कलमठ - वरवडे बायपास मार्गाचा प्रस्ताव पूढे आला. या गावातील भूसंपादन प्रक्रिया पार पडली आहे. मात्र, या बायपासच्या महामार्गालगतच्या तोंडालाच कणकवली शहरात असलेली पोस्ट खात्याची जमीन ही मोठी अडचणीची ठरत आहे.

शहरातील सह्याद्री हॉटेलसमोर महाडिक यांच्या घरामागून हा बायपास रस्ता जाणार आहे. कणकवली नगरपंचायतच्या डीपी प्लॅन मध्ये हा रस्ता असूनही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे हा बायपास रखडला आहे.

डीपी प्लॅन मध्ये ही जागा आरक्षित असल्यामुळे त्याचे हस्तांतरण नगरपंचायतकडे होणे आवश्यक होते. यासाठी १० लाखांहून अधिक निधीची उपलब्धता नगरपंचायतने केली होती. तो निधी अद्यापही तसाच अखर्चित आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांच्या कार्यकाळात पोस्ट खात्याचे क्षेत्रीय अधिकारी आणि नगरपंचायत दरम्यान झालेल्या बैठकीत या जागेत पोस्ट खात्याला विकासासाठी नगरपंचायतने परवानगी द्यावी, त्याबदल्यात पोस्ट खात्याकडून उर्वरित जागेतून आशिये बायपाससाठी आवश्यक जागेचे भूसंपादन नगरपंचायतला दिले जाईल असे चर्चेअंती ठरले.

तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंह यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतने पोस्ट खात्याने केलेल्या मागणीनुसार जागा विकसित करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, ही परवानगी मिळाल्यानंतर पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपले हात वर केले.

१ वर्षाच्या आत नगरपंचायतने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणे आवश्यक होते. तसे शक्य न झाल्याने नगरपंचायत प्रशासनाकडे वाढीव मुदतीसाठी परवानगी घेणे आवश्यक असते. तसे झालेले नाही. त्यामुळे पोस्ट खात्याला जागा विकसित करण्यासाठी दिलेली परवानगीच नगरपंचायतने रद्द केली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गPost Officeपोस्ट ऑफिसcollectorजिल्हाधिकारी