शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

वैद्यकीय अधिकाऱ्यालाच ‘स्वाईन फ्लू’

By admin | Published: March 27, 2015 12:33 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच रूग्ण

पुरळ : दोन महिने राज्याला सतावणाऱ्या स्वाईन फ्लूचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिलाच रूग्ण देवगडमध्ये आढळला आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरेश अखिलेश आगाशे यांनाच स्वाईन फ्लू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली . देवगड ग्रामीण रूग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अमरेश अखिलेश आगाशे काही दिवसांपूर्वी पुणे येथे गेले होते. त्यानंतर देवगडात आले असता त्यांना व्हायरल फिवर झाल्याने ते आजारी पडले होते. देवगडाच्या खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले असता २४ मार्च रोजी मिळालेला रक्त तपासणी अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटीव्ह आला आहे. डॉ. आगाशे यांच्यावर देवगड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पत्नीलाही या आजाराची लागण झाली असल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता पाठविले आहेत. त्यांनाही स्वाईन फ्लू झाल्याची लक्षणे आढळून येत आहेत. डॉ. आगाशे हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला आहे. देवगडात पहिला रुग्ण देवगड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमरेश अखिलेख आगाशे यांना स्वाईन फ्लू झाल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. त्यांच्या पत्नींनाही स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे आढळली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथे पाठविले आहेत. स्वाईनचा रूग्ण देवगडामध्ये आढळल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे