कणकवली : क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांने बैठका घेणे हे चुकीचे असून त्याच्यामुळे तालुक्यात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे यांनी तहसीलदार यांच्याजवळ केली आहे.हरकुळ बुद्रुक येथील एका संस्थेत कार्यरत असलेल्या क्वारंटाईन कर्मचाऱ्याने अनधिकृतपणे बैठका घेतल्या. या कर्मचाऱ्यांची आई बाधित आहे. तर कर्मचारी स्वत: निगेटिव्ह असला तरीही तो कॅरिअर ठरून त्याच्यापासून इतर कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात बैठकीला बोलावलेल्या कर्मचाऱ्यांची काही चूक नसतानाही वरिष्ठांच्या आदेशानुसार अनधिकृत बैठक घेणाऱ्या त्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे बाकीचे कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.याबाबत तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेत ही मागणी करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार एस. व्ही. गवस, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ उपस्थित होते. संबंधित कर्मचारी व त्याची आई परजिल्ह्यातून आल्यानंतर त्यांना त्यांच्याच खोलीत क्वारंटाईन करण्यात आले होते. मग त्यांनी बैठका घेतल्याच कशा? असा सवाल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना यावेळी केला.त्याला बैठका घेण्यास कुणी सांगितले, त्याचीही चौकशी करा. आज त्याच्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. अजूनही अनेकजण हायरिस्क संपर्कात आहेत. तालुक्यात यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे.
क्वारंटाईन असताना बैठका, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 12:09 PM
क्वारंटाईन असणाऱ्या कर्मचाऱ्यांने बैठका घेणे हे चुकीचे असून त्याच्यामुळे तालुक्यात संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे यांनी तहसीलदार यांच्याजवळ केली आहे.
ठळक मुद्देत्याच्यावर गुन्हा दाखल करावा :संदेश पारकर क्वारंटाईन असताना बैठका, तहसीलदारांचे लक्ष वेधले