कणकवली : महाराष्ट्र राज्यातील नगरसेवकांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र या संघटनेची यावर्षी स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा म्हणून कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटिल यांनी केली आहे.महाराष्ट्रात या संघटनेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बांधणीला सुरूवात झालेली आहे. त्यातलाच एक भाग म्हणून सध्या कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेविका म्हणून कार्यरत असलेल्या मेघा अजय गांगण यांना हे पद देण्यात आले आहे. हि संघटना पक्षविरहीत आहे. या संघटनेचे ठाणे आणि पुणे येथे मुख्य कार्यालय आहे.मेघा गांगण या सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात. रोटरी क्लबच्या माध्यमातूनही त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविलर आहेत. तर 'साज' ग्रुपच्या माध्यमातून महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याबरोबरच अनेक समस्याही सोडविल्या आहेत. त्यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन महिलांसाठी केले आहे.नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची प्रतिक्रिया मेघा गांगण यांनी व्यक्त केली आहे.
नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मेघा गांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 4:05 PM
नगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा म्हणून कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राम भारत जगदाळे आणि प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे पाटिल यांनी केली आहे.
ठळक मुद्देनगरसेवक परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी मेघा गांगण सिंधुदुर्गातही संघटना बांधणी सुरू