शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

सदस्य, अभियंत्यांत बाचाबाची

By admin | Published: June 25, 2015 11:30 PM

बांधकाम समिती सभेत खडाजंगी : ‘पेयजल’ बिलासाठी ठेकेदाराकडे एक लाखाची मागणी

सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील गोवळ सोमलेवाडी येथील पेयजल योजनेअंतर्गत कामाची बिले काढण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा शाखा अभियंत्याने ठेकेदाराकडे चक्क एक लाख रूपयाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप सदस्य विष्णु घाडी यांनी केला. या विधानाबद्दल सदस्य व संबंधित शाखा अभियंत्यांमध्ये खडाजंगी झाली. केलेले आरोप सिद्ध करा. मी नोकरीचा राजीनामा देईन असे आव्हान अभियंत्याने केल्याने सभागृहात जोरदार बाचाबाची झाली. मात्र, सभापती संजय बोबडी यांनी अखेर या विषयाची दखल घेत सभागृहात बोलताना भान ठेवा, चुकीचा शब्दप्रयोग करून सभागृह बदनाम करू नका असे खडेबोल सुनावत विष्णू घाडी यांना अखेर गप्प केले.जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संजय बोबडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील डॉ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी सदस्य भगवान फाटक, आत्माराम पालयेकर, पंढरीनाथ राऊळ, रूक्मिणी कांदळगावकर, विष्णू घाडी, सदाशिव ओगले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.पैसे देणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचे अंदाजपत्रक वाढविले जाते तर पैसे न देणाऱ्याचे अंदाजपत्रक कमी करण्याची धमकी दिली जाते. अशाच प्रकारे गोवळ सोमलेवाडी येथील कामाचे बिल देण्यासाठी पाणीपुरवठा शाखा अभियंत्याने १ लाखांची मागणी केल्याचा आरोप केला.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०१५ - २०१६ साठी जिल्ह्याला ९ कोटी ४५ लाख निधी खर्चाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी गेल्या दीड महिन्यांत ३ कोटी २४ लाख निधी खर्चाची कामे करण्यात आली असून आतापर्यंत ८६ हजार मनुष्य दिन कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)सभागृहाला बदनाम करू नका लाखाच्या विषयावरून सभागृहात खडाजंगी होताच संतापलेल्या सभापती बोबडी यांनी सदस्य विष्णू घाडी यांना तुम्ही सभागृहाचे भान ठेवून बोला, चुकीचा शब्दप्रयोग करून सभागृहाला बदनाम करू नका असे खडेबोल सुनावले तर माजी सभापती भगवान फाटक यांनीही सदस्य घाडी यांनी सभागृहाला शोभणारे शब्द वापरा असे सांगितले. यावर घाडी यांनी काय चुकीचे बोललो सांगा, चुकीचे असेल तर सभागृहाची माफी मागतो असेही सांगितले.बांधकाम विभागावर हल्लाबोल बांधकाम विभागावरही ठेकेदारांकडून पैसे घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पैसे घेतल्याची फाईल पुढे सरकत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.चार भिंतीत प्रकरण मिटविले१ लाखांच्या मागणीसंदर्भात संबंधित अभियंत्याला सभागृहात जाब विचारला. यावेळी अभियंत्याने हा आरोप फेटाळत संबंधित काम निकृष्ट होत असेल तर बिले कशी काढणार? मी कोणत्याही ठेकेदाराकडे पैशाची मागणी केलेली नाही. निकृष्ट कामाचे बिल न दिल्याने बिनबुडाचे आरोप माझ्यावर केले जात आहेत. हे आरोप मी सहन करणार नाही. आपण केलेले आरोप सिद्ध कराल तर मी राजीनामा देईन असे सांगत माझी नाहक बदनामी करणाऱ्या संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारी दाखल करेन असेही सांगितले. त्यामुळे हा विषय सभागृहात बोलणे योग्य नाही. आपण हा विषय माझ्या चेंबरमध्ये सोडवू असे सभापती संजय बोबडी यांनी सांगत वादावर पडदा टाकला.