शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

वीरांच्या स्मृतींनी आप्त हेलावले

By admin | Published: September 23, 2015 9:47 PM

रत्नागिरी : भारत - पाक युद्धातील विजयाचा सुवर्ण महोत्सव

शोभना कांबळे - रत्नागिरी --१९६५ साली झालेल्या भारत - पाकिस्तान युद्धातील विजयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाने शहीद झालेल्यांच्या पराक्रमाच्या स्मृती जाग्या झाल्या अन् या स्मृतीनी त्यांच्या आप्तांना हेलावून टाकले. या कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना या साऱ्यांना अश्रू लपवता आले नाहीत.पाच महिने भारताचे पाकशी युद्ध सुरू होते. भारतीय सैनिकांनी जिवाची बाजी लावत, रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पाकिस्तानला पळवून लावले व विजय मिळविला. मात्र, यात अनेक भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. यात रत्नागिरी जिल्ह्यातील १५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सैनिकाचा समावेश होता. या युद्धात अखेर विजय मिळालाच. यापैकी काही तर २०-२२व्या वर्षीच सैन्यात दाखल झाले होते. काही देशसेवेने भारलेले असल्याने आपल्या नववधूला, चार - सहा महिन्यांच्या चिमुकल्याला मागे टाकून युद्धासाठी गेले ते परत न येता मातृभूमीच्या कुशीतच कायमचे विसावले होते.या विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमिताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या युद्धात तसेच इतर युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अशा एकूण ५१ जणांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान १९६५ सालीच्या युद्धाची चित्रफीत दाखवण्यात आली होती. त्यामुळे या साऱ्यांना या युद्धभूमी दिसली होती. त्यामुळे आपला वीरसैनिक कसा लढला असेल, याची त्यांना कल्पना आली. त्यामुळे वीर माता - पिता, पत्नी यांचा सत्कार होताना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. आपल्या पती किंवा पुत्राला गमावल्याचे दु:ख एवढी वर्षे सहन करीत असतानाच मातृभूमीसाठी त्याने आपले प्राण अर्पण केले आणि त्याच्या पराक्रमाबद्दलची कृतज्ञता याबद्दल आज आपला गौरव होतोय, याचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 1१९६२, १९६५ आणि १९७१ अशा तीनही युद्धात सहभागी झालेल्या पांडुरंग राघो जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.2रत्नागिरीतील गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुलांनी ध्वजनिधीतून १० हजार रूपयांचा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी मिळवून दिला आहे.3कर्नल नाईक यांनी माजी सैनिकांच्या अवलंबितांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमासाठी शाळांमधील मुले स्वयंसेवक होते. सत्कारमूर्तीचे नाव पुकारताच या वयोवृद्ध असलेल्या वीरमाता, वीरपत्नी यांच्याजवळ येऊन व्यासपीठावर घेऊन जाण्याचे काम ही मुले करीत होती. परत त्यांना जाग्यावर आणून बसविताना अनेक माता या मुलांच्या गालावरून मायेचा हात फिरवायला विसरल्या नाहीत.कार्यक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीतील गायिका अंजली लिमये यांच्या प्रसिद्ध कवी प्रदीप यांचे गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेल्या ‘ए मेरे वतने के लोगो’ या गाण्याने झाला. त्यामुळे सैनिकांच्या नातेवाईकांबरोबरच उपस्थित नागरिकांनाही गहिवरून आले. पुन्हा सत्कारादरम्यान लिमये यांनी ग. दि. माडगुळकर यांच्या ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी’ या प्रसिद्ध रचनेने त्यांना आदरांजली अर्पण केली. या गाण्याने साऱ्यांनाच पुन्हा हेलावून टाकले. यावेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह पूर्णत: भारावून गेले होते.