मालवण : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्यावतीने किनारपट्टीवर राबविण्यात येणाऱ्या निर्मल सागर तट अभियानात कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आणि शासनाचे जलदूत आणि जल चेतना अभियानाचे प्रणेते राजेंद्रसिंह राणा यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. मालवण दांडी मोरयाचा धोंडा येथील समुद्र किना?्यावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मालवण दांडी येथे कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जलदूत राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी सायंकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार वीरधवल खाडे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्याधिकारी रंजना गगे, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, एस. एस. गोसावी, ग्रामसेवक युवराज चव्हाण यासह वायरी सरपंच सुजाता मातोंडकर, प्रियांका रेवणकर, हरी खोबरेकर, भाई मांजरेकर, श्यामा झाड तसेच सर्व शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दांडी किनाऱ्यावर राबविण्यात आलेल्या मोहिमेत ओला, सुका कचरा वेगळा करण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रमाणे वायरी ग्रामस्थांनी मोहिमेत सहभाग घेतला. आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रात्री वायरी ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधल्यानंतर शिवकालीन पोवाड्यांचा कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)स्वच्छतेने जागवूया महाराजांचा इतिहासकिल्ले सिंधुदुर्ग उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील मोरयाचा धोंडा या पवित्र ठिकाणी जलपुजन केले होते. महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी येथील समुद्र किनाऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे महाराजांचा इतिहास जागविण्यासाठी किनाऱ्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराजांच्या पवित्र ठिकाणच्या किनाऱ्यांची स्वच्छता करणे हे आपले भाग्य असल्याचे कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.प्रशासन, ग्रामस्थ यांना साथीला घेऊन कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी स्वच्छता मोहीम राबविली खरी, पण मोहिमेच्या सुरुवातीला पूजन केलेल्या मोरयाच्या धोंड्याचे ठिकाणी कच?्याचा साचलेल्या ढिगाकडे सर्वांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे सायंकाळी राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम चचेर्चा विषय ठरली होती.
कोकण आयुक्तांनी दिला स्वच्छतेचा संदेश
By admin | Published: January 01, 2017 10:36 PM