सावंतवाडी : ‘दमा दम मस्त कलंदर....’ या गाण्यासह सुप्रसिद्ध गायक ‘मिका सिंग यांनी सुंदरवाडी महोत्सवाच्या व्यासपीठावर प्रवेश करताच प्रेक्षकांनी ठेक्यावर नाचावयास सुरुवात केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मिकासिंग यांनी सादर केलेल्या गाण्यांवर रसिकांनी भरभरुन दाद दिली.सुंदरवाडी पर्यटन महोत्सव २०१५ च्या शेवटच्या दिवशी सोमवारी सांगता कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध गायक मिकासिंग यांचा लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी डी. जे. साऊंड सिस्टीमच्या साथीवर नवीन गाण्यांच्या सादरीकरणाने रसिकांनी मने जिंकली. मिकासिंगने सुंदरवाडी महोत्सवात प्रथमच येत ‘मै तेरे अगल बगल हू’ या गाण्याने सुरुवात केली. एकापेक्षा एक अप्रतिम अशी गाणी त्याने सादर केली. हिंदी गाण्यांबरोबरच जुनी किशोरकुमार यांची गाणी खास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासाठी सादर केली. यामुळे तरुणांसह वृद्ध वर्गही रात्री उशिरापर्यंत मिकासिंग यांच्या गाण्यांवर नादमय झाला होता. आप जिंदगी में आये तो बात बन जाये, जग सारा जग सारा निकल गया, मौलाही मौला, राणी तू मै राजा, साडी के फॉल सा, देखा जो तुझे यार दिल मे बजी गिटार, चिंताता चिता चिता, ये शाम मस्तानी मदहोश किये जाए, प्यार दिवाना होता है, मेरे सामनेवाली खिडकी में एक चाँदसा तुकडा रहता है, जुमे की रात है, बारा महिने मे बारा तरिके से, देवा श्री गणेशा, हायो रब्बा हायो रब्बा या गाण्याने पंजाबींना नाचवले.जिमखाना मैदानावर व मैदानाच्या बाहेर थंड हवामानात राहून या पर्यटन महोत्सवातील मिका सिंग यांच्या कार्यक्रमाचा आनंद सावंतवाडीतील महोत्सवात आलेल्या रसिक प्रेक्षकांनी घेतला. रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी या लाईव्ह शोला प्रेक्षकांनी दर्शविली. या कार्यक्रमाला मिकासिंगने स्वत:चे संगीत साहित्य आणले होते. यामध्ये त्याला साथ देणारे गीता झेला, तरिका भाटिया, गिटार वादक अमरदीप ढोल कुलदीप, इम सनी फराज, रिदम दीपक साठे, ड्रम जयसिंग, वायोलीन रवी कुमार, की बोर्ड- हॅरी, ढोल- साबली, सूरज फुलास या सर्वांनी वाद्यसाथ दिली. मिकासिंग याचे स्वागत माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नीलम राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनीकेले. (वार्ताहर)तेरी मेरी प्रेम कहानी है मुश्कील अशी सर्व गाणी सादर करीत १९९० मध्ये गायलेल्या ‘सावन में लगगयी आग’ या गाण्याने शेवट केला. या सर्व गाण्यातील ‘दमा दम मस्त कलंदर’ हे गाणे मिकासिंग याने दोनवेळा सादर केले. पंजाबीसह स्थानिक मुलांनी या गाण्याच्या ठेक्यावर जोरदार नृत्य सादर केले.
मिकासिंगच्या गाण्यांनी रसिकांना नाचवले
By admin | Published: February 10, 2015 9:58 PM