शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पर्यटन विकासकामांत लाखोंचा भ्रष्टाचार

By admin | Published: April 28, 2016 8:51 PM

अनिल चव्हाण : आंबोली वनविभागाबाबत जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांकडे चौकशीची मागणी

आंबोली : आंबोली वनविभागाने पर्यटननिधीतून केलेल्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला असून, या प्रकरणात उपवनसंरक्षक व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी निवेदनातून केली आहे. आंबोलीत गतवर्षी वनपार्कमध्ये अनेक कामे करण्यात आली, पण या कामांच्या दर्जाकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. वनअधिकाऱ्यांना वारंवार सूचना, तक्रार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली. यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, याठिकाणी बहुतांश कामे केली नाहीत, पण कागदोपत्री ती झाल्याचे दाखवून ५० लाखांपेक्षा जादा रकमेवर डल्ला मारण्यात आला आहे. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, दोन महिन्यांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी सर्व प्रकारची माहिती मागितली. त्यामुळे वनअधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महिन्याभरात वर्षभराचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी रंगरंगोटीची कामे जोरदार करून घेण्यात आली. निधी खर्ची घालण्यासाठी झाडांचे पार वगैरे रंगविण्यात आले. मात्र, ही कामे वनमजुरांकडून करण्यात आली. शासनाचा पगार असणाऱ्या वनमजुरांकडून ही कामे करण्यात आली असून, पर्यटनाचा निधी गिळंकृत करण्याच्या मुद्दा गडद झाला आहे. शिवाय येथील वनबागेतील जुन्या खेळण्यांना रंग देऊन नवीन खेळणी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले आहे. लॉन व सुशोभित झाडांवर खर्च दाखवण्यात आला. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. येथील नर्सरीवर यापूर्वी १४ लाख खर्चूनही त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकंदरीत जुन्याच कामांवर लाखो रुपये खर्च दाखवून ही रक्कम लुबाडण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. २०१० पासून २०१५ पर्यंत वनविभागाच्या उद्यानात जवळपास ९० लाख रुपये खर्च दाखवण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात तेवढ्या निधीची कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुुळे माहिती देण्यास सुरुवातीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ सुरू केली. मात्र, चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पण ५० लाखांचा हिशेब कसा व कुठे दाखवणार, असा सवाल आता निर्माण झाला आहे. यापूर्वीचे वनक्षेत्रपाल बदली होऊन गेले आहेत. २०१० पासूनची माहिती मिळाली असून यामध्ये मत्स्यकी कमळाची टाकी गार्डन असा प्रवेशद्वारावर नामफलक आहे.प्रत्यक्षात तेथे काहीच नाही. वर्षभरात दहा पर्यटकदेखील येथे जात नाहीत. कोणालाच येथील काहीच माहिती नाही. त्यामुळे येथे गोलमाल वाढला आहे. (वार्ताहर)ही झाली बोगस कामेसन २०१० साली चौकुळ-शिरगावकर पॉर्इंट येथे १८ लाख रुपये खर्चून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून वनविभागाने बोगस काम केले होते. प्रत्यक्षात तेथे वनअधिनियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या काम वनअधिकाऱ्यांनी केले. मुळात शिरगावकर पॉर्इंट येथून दिसणार नाही. तो डाव्या बाजूला घेण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते व जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने मागणीही केली होती. मात्र, वनअधिकाऱ्यांनी मनमानी करत येथेच काम केले. तेही बोगस. प्रत्यक्षात दरडीच्या ठिकाणी ३५ लाख व ४५ लाख अशा दोनवेळच्या कामातून रेल्वेच्या रूळाप्रमाणे बसलेले लोखंडी काम उचकटून शिरगावकर पॉर्इंट येथे बसविण्यात आले. मात्र, येथे पुन्हा १८ लाख पर्यटनातून खर्च दाखवून काम करण्यात आले आहे.पर्यटकांमधून नाराजीचा सूरदहा दिवसांपूर्वीच शिरगावकर पॉर्इंट येथे विंग गॅलरी बसविली. यासाठी सव्वादोन लाख रुपये खर्च दाखवला. त्यामुळे ग्रामस्थांच्या मूळ मागणीला बगल देत हे काम करण्यात आले. यामुळे वनविभागाच्या आडमुठी धोरणाने विंग गॅलरीसुद्धा सदोष बनवली आहे. तीव्र उताराची ही गॅलरी सर्वांनाच धोकादायक आहे. अशा प्रकारची सर्व कामे वनविभागाकडून केली गेल्याने पर्यटनाचा लाखोंचा निधी गायब झाला आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला बाधा येत असून, पर्यटकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.तरी वनविभागाच्या या भ्रष्ट कारभाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षकांनी कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.